जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
महाविकास आघाडी सरकार हे महाभकास आघाडी सरकार आहे. या शासनाच्या कायदा व सुव्यवस्थेच्या तीनतेरा झाल्या आहेत, अवैध धंदे बोकाळले आहेत शेतकरी अडचणीत आहे, महागाईने तर कळसच केला आहे गोरगरीब सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आलेली असताना सर्व आघाडयावर अयशस्वी ठरलेल्या, झोपेचे सोंग घेतलेल्या आघाडी शासनास जागे करण्याची वेळ आलेली आहे.
ओबीसी आरक्षण बचाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन असून मा.मंत्री.प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथे खर्डा चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळेस महाविकास आघाडी सरकार हे सर्व आघाडयावर अयशस्वी ठरत असून झोपेचे सोंग घेतलेल्या महाविकास आघाडी शासनास जागे करण्याची वेळ आलेली आहे तसेच राजकिय
ओबीसी आरक्षण रद्द करून ओबीसी समाजावर या शासनाने अन्याय केला आहे जोपर्यंत ओबीसीचे राजकिय आरक्षण रद्दचा आदेश मागे घेतला जात नाही तोपर्यंत होवू घातलेल्या निवडणूका होऊ देणार नाही.
मागासवर्गीय पदोन्नती मधले आरक्षण संपुष्टात
आणले ओबीसी आरक्षण होते ते देखील त्यांच्या नाकर्ते व
निष्काळजीपणामुळे या सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेले. या सरकारच्या मनात ओबीसी बद्दल कसलीही काळजी नाही. महाविकास आघाडी नाही, महाभ्रष्टाचारी सरकार आहे. दोन महिन्यांमध्ये दोन मंत्री घरी पाठवले आहेत.असे शिंदे यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षण हा ओबीसींचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे, यावेळी अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले, खर्डा चौकात हे चक्काजाम आंदोलन दोन तास ठिय्या मांडून करण्यात आले, आघाडी शासनाच्या विरोधात घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरले होते.
यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हा
परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, उपसभापती रवि सुरवसे, माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवान मुरूमकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, सुधीर राळेभात, तात्याराम पोकळे, पांडुरंग उबाळे, लहु शिंदे, मोहन गडदे, माऊली जायभाय, भागवत सुरवसे, दत्ता चिंचकर, सागर सोनवणे, बजीराव गोपळघरे, कांतीलाल खिवसरा, उदय पवार, धनंजय गावडे, संतोष हजारे, गौतम हजारे, गोरख घनवट, प्रसिद्धी प्रमुख उध्दव हुलगुंडे, विकी घायतडक, आप्पा ढगे व महिला उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागण्यांचे निवेदन माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देण्यात आले. शेवटी माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह भाजपा. कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून देण्यातआले.