जामखेड न्युज——
खळबळजनक बातमी—
जामखेड पंचायत समितीतील कामचुकार कर्मचारी निलंबित
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे अँक्शन मोडवर
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे जामखेड तालुक्यात हजर झाल्यापासूनच शिक्षकांना चांगली शिस्त लावली तर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले. तर कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला त्यामुळे जामखेड तालुक्यात कधी नव्हे ते एवढे चांगले शैक्षणिक वातावरण प्रथमच तयार झाले असून वेगवेगळे उपक्रम राबवून चांगली शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे. याचवेळी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे शिक्षण विभागाला एक शिस्त लागली आहे.
शिक्षण विभागात काम करत असताना शिक्षण क्षेत्रात चांगले वातावरण निर्माण झाले पण गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ सहायक गोरख नरवणे हे वारंवार कार्यालयात गैरहजर राहिल्याने शिक्षकांची व प्रशासकीय कामे होत नव्हती.
त्यांना अनेक वेळा सुचना व नोटीस दिल्या परंतु त्यांच्या वर्तनात व कामकाजात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे धनवे यांनी त्यांचा निलंबनाचा प्रास्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना पाठविला होता.
याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गोरख नरवणे कनिष्ठ सहायक यांना सेवानिलंबीत केले आहे. निलंबन काळात मुख्यालय पंचायत समिती अकोले देण्यात आले आहे. धनवे हे अॅक्शन मोडवर आल्यामुळे कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
या कारवाई मुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात बाळासाहेब धनवे यांनी काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचारी यांच्या वर कौतुकाची थाप तर कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एक प्रकारची शिस्त निर्माण झाली आहे.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी शिक्षण विभागात चांगली शिस्त निर्माण केली आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.