जामखेड न्युज——-
युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या बुधवारी कर्जत-जामखेड बंद
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार संघर्ष यात्रा संपवून संघर्ष यात्रेचे मुद्दे व एमआयडीसीचा प्रश्न मांडण्यासाठी विधानभवनात धडक मोर्चा घेऊन जात असताना पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्ह उद्या बुधवारी दि. १३ डिसेंबर रोजी कर्जत जामखेड बंद ठेवण्याचा निर्णय समस्त कर्जत जामखेड करांनी घेतला आहे असा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्तवातील युवा संघर्ष यात्रेची समारोपाची सभा संपल्यानंतर विधानसभेकडे कूच करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.
आपल्या मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत खासगी वाहनात बसवून घेऊन गेले होते.
राज्यात युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. MPSC परीक्षेसंदर्भात प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचा मुद्दा आहे, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही निघालो आहोत. पण या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही, त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन जात आहोत, असं रोहित पवार म्हणाले. एखाद्या आमदाराचे जर कुणी ऐकत नसेल तर सामान्य माणसाचे कुणी ऐकणार? हे सरकार भित्रं आहे असंही ते म्हणाले. या सरकारला अहंकार आहे. महिलांचे, तरुणांचे, MPSC परीक्षार्थींचे, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. याबाबते निवेदन दिले, हे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करु असं म्हटलं. पण यांना अहंकार आहे. तहसीलदार आणि भाजपच्या अध्यक्षांना आमच्याकडे पाठवत आहेत, असेही रोहित पवार यांनी म्हटले.