जामखेड न्युज——
माध्यमिक शिक्षक संघाने उमेदवारी दिल्यास नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषद निवडणूक लढविणार – भरत लहाने
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे जोरात सुरू आहे. मतदार नोंदणी सुरू आहे. यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिक्षक संघटनेत अनेक वर्षांपासून सक्रिय असणारे अहमदनगर माध्यमिक शिक्षक संघटनेचे हिशोब तपासणीस तसेच टीडीएफ शिक्षक संघटनेचे सचिव भरत लहाने हेही इच्छुक आहेत. जर शिक्षक संघटनेचे उमेदवारी दिली तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे लहाने यांनी सांगितले आहे यामुळे शिक्षक मतदारसंघात चांगली चुरस निर्माण होईल असे चित्र आहे.
भरत लहाने हे विद्यार्थी दशेपासून चळवळीत काम करणारे आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. 55 तुकड्या अनुदानावर आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे 55 तुकड्या अनुदानावर आल्या व शिक्षकांना पगार सुरू झाला होता. तसेच 2005 च्या अगोदर विनाअनुदानित तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षकांसाठी तसेच 2005 नंतरच्या काम करणाऱ्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मिळवण्यासाठी त्याचा लढा आजही चालू आहे.
विद्यार्थी दशेपासून ते चळवळीत काम करणारे आहेत श्रींगोदा येथे बीएस्सीला असताना ते काॅलेजमध्ये सीआर होते. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. आता जर माध्यमिक शिक्षक संघटनेने उमेदवारी दिली तर शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत.
शिक्षक संघटनेच्या पदाबरोबरच कार्यकारीणी सदस्य अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक संघ, उपाध्यक्ष जामखेड तालुका गणित संघटना, सचिव दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटी पगारदार नोकरांची पतसंस्था जामखेड अशा पदावर काम करत आहेत.
माध्यमिक शिक्षक संघटनेने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार आहे. तसेच शासन दरबारी अधिक जोमाने प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करणारच, जुनी पेन्शन शिक्षकांच्या हक्काची आहे ती मिळवण्यासाठी निश्चितपणे लहाने सर आमदार झाल्यास सोडवतील अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे.
संपूर्ण नगर जिल्ह्यात भरत लहाने यांचा चाहता वर्ग खुप मोठ्या प्रमाणात आहे.