Tuesday, March 17, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड परिसरात बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण वाचा प्रत्यक्षदर्शीचे चित्तथरारक अनुभव

जामखेड परिसरात बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण वाचा प्रत्यक्षदर्शीचे चित्तथरारक अनुभव

0
1832

जामखेड न्युज——

जामखेड परिसरात बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण
वाचा प्रत्यक्षदर्शीचे चित्तथरारक अनुभव

जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध सौताडा धबधबा आणि प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त येत आहेत. जामखेड इथून असेच एक कुटुंब दर्शनासाठी कारमधून गुरुवारी दुपारी चार वाजता सौताडा येथे आले होते अचानक त्यांना पांडव वस्ती समोरील एका नदीच्या वळणाजवळ आल्यानंतर पुढे काही अंतरावर अचानक गर्द झाडीतून एक बिबट्या समोर येताच सर्व कुटुंब घाबरले होते.

आम्ही दहिफळे कुटुंबीयांनी बिबट्याचा प्रत्यक्ष पाहिलेला थरारक हा अंगावर शहारे येणारा होता. अशी प्रतिक्रिया अशोक दहिफळे यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली. ते म्हणाले की, सायंकाळच्या सुमारास कुटुंबासह चारचाकी गाडीने घाटाखालील रस्त्याने जात असताना नदीच्या जवळ आमच्या गाडीच्या समोर बिबट्या आला. तो गुरगुरत होता गाडीतील सर्व घाबरले होते ताबडतोब काचा बंद केल्या हार्न वाजवला व बिबट्या झाडीत निघून गेला. दहिफळे यांनी घेतलेला व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटोदा तालुक्यातील सौताडा श्रीक्षेत्र रामेश्वर दरीत
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास जामखेड
येथील अशोक दहिफळे हे पर्यटक कार मधून येत होते सायंकाळी पाचच्या समारास जामखेड रस्त्यावरील मुख्य घाटात खालच्या छोट्या रस्त्याने पांडवस्ती मार्गे ते रामेश्वर दरीकडे जात असताना अचानक गर्द झाडीतून बिबट्या कारच्या समोर आला तेव्हा कार चालवत असलेले अशोक दहिफळे यांनी अचानक कारला ब्रेक लावला तोपर्यंत कुटुंबीयांनी कारच्या काचा बंद केल्या समोर असलेली कार पाहून बिबट्या गुरगुरत होता तेव्हा त्या कुटुंबीयांनी बिबट्या झाडीत जात असल्याचा व्हिडिओ चित्रित केला. गाडीच्या हॉर्नचा आवाजाने बिबट्या क्षणात गायब झाला आणि गाडीतील सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला परिसरातील नागरिकांनी सुद्धा सतर्क रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.


परिसरातील शेतकऱ्यांनी पर्यटकांनी काळजी
घ्यावी सौताडा परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळतात आम्ही रामेश्वर परिसरात पथक पाठवले पथकाने पाहणी केली असता बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.

आजूबाजूच्या शेतकरी व ग्रामस्थांनी काळजी घेण्याची गरज असून रात्री अपरात्री शेतात जाणे टाळावे जवळ काडेपेटी किंवा कंदील ठेवा शक्य असल्यास वाजणाऱ्या वस्तूच जवळ ठेवाव्यात बॅटरी लाईट पेक्षा वन्यप्राणी आगीच्या जवळ येत नाही त्यामुळे शेकोटी चा वापर करावा अशी आवाहन पाटोदा वनपरिक्षेत्राधिकारी एस एस काळे यांनी केले आहे.


वीस दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यातील आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या दिसला होता. वनविभागाने तो सुरक्षित पणे जेरबंद केला होता. आता वीस दिवसांनंतर सौताडा परिसरात बिबट्या असल्याने परिसरात एकच घबराहट निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर सौताडा परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ फिरत होता याबाबत जामखेड न्युजने माहिती जाणून घेतली असता व्हिडिओ खरा असल्याचे दिसून आले.

 

जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. काही दिवसांपूर्वी धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर वीस दिवसांपूर्वी आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.

 

चौकट

बिबट्या असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. अशोक दहिफळे यांनी प्रत्यक्षात बिबट्या पाहिला व व्हिडिओ चित्रण केले आहे. तरी नागरिकांनी अंधारात एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.

मोहन शेळके
(कर्जत-जामखेड उपविभागीय वनाधिकारी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!