जामखेड न्युज——
नगरपरिषद पेक्षा ग्रामपंचायत बरी
जामखेड नगरपरिषद हद्दीतील हजारो शेतकरी शासकीय योजनेंपासून वंचित
जामखेड नगरपरिषद हद्दीतील हजारो शेतकरी हे कांदा चाळ, ठिबक सिंचन, शेततळे, सिंचन विहीर, फळबाग योजना या शासकीय योजनांपासून वंचित आहेत. जामखेड नगरपरिषद हद्दीतील जांबवाडी, चुंभळी, लेहनेवाडी, धोत्री, जमदरवाडी, बटेवाडी, भुतवडा या गावातील बहुतेक लोक शेतीच करतात पण नगरपरिषद हद्दीत असल्याने शासकीय योजना पासून वंचित राहावे लागत आहे.
नगरपरिषद स्थापन करताना लोकसंख्या कमी पडत असल्याने जशी ग्रामपंचायत रचना होती तशीच रचना ठेवत जामखेड नगरपरिषद हद्दीत जांबवाडी, चुंभळी, लेहनेवाडी, धोत्री, जमदरवाडी, बटेवाडी, भुतवडा या गावांचा समावेश केला होता. पण आता शासकीय योजना मिळत नसल्याने या गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.
जांबवाडी, चुंभळी, लेहनेवाडी, धोत्री, जमदरवाडी, बटेवाडी, भुतवडा या गावातील शेतकऱ्यांनी आम्हाला नगरपरिषदेत नको परत ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या कांदा चाळ, ठिबक सिंचन, शेततळे, सिंचन विहीर, फळबाग योजना या शासकीय योजनांपासून जामखेड नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे यामुळे नगरपरिषद पेक्षा ग्रामपंचायत चांगली असा सुर सध्या या सात गावातील नागरिकांचा निघत आहे.
चौकट
पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या फक्त ग्रामपंचायत साठीच लागू करता येतात. तसेच रोजगार हमी योजनेचे नावच ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. त्यामुळे त्या योजना फक्त ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येतात.
प्रकाश पोळ (गटविकास अधिकारी जामखेड)