जामखेड न्युज——
न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे एच. यु. गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चित्रकला स्पर्धा संपन्न
एच. यु. गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गेल्या वीस वर्षांपासून शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आज न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे चित्रकला स्पर्धा संपन्न झाली.
यावेळी एच. यु. गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे, श्याम पंडित, मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, राजेंद्र पवार, बाबासाहेब समुद्र, चित्रकला शिक्षक जाहेद बागवान, सुभाष बोराटे, दीपक सुरवसे, मुकुंद वराट, उमराव लटपटे, नवनाथ सदाफुले यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे यांनी सांगितले की, जीवनात यश मिळवण्यासाठी आताच काय करायचे हे ठरवले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांनी करिअर साठी या विषयाची निवड केली तरी भविष्यात खुप संधी आहेत.
मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चित्रकला स्पर्धेसाठी कला शिक्षक जाहेद बागवान व सर्व अध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.
या वेळी विद्यालयाचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागवान सर यांनी केले तर सुरवसे सर यांनी आभार मानले.