जामखेड न्युज——
फराळ दिवाळीचा साखरपेरणी लोकसभेची
आमदार निलेश लंके यांची प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्या निवास्थानी दिवाळी फराळ निमित्त सदिच्छा भेट
आमदार मा,निलेश लंके यांची नगर दक्षिण मतदार संघातील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. १५ दिवसाच्या आत दुसऱ्यांदा जामखेड दौऱ्यावर आल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फराळ दिवाळीचा असला तरी साखरपेरणी लोकसभेची असे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार विखे विरोधक म्हणून आमदार लंके ओळखले जातात. जामखेड येथे प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्या निवास्थानी दिवाळी फराळ निमित्त सदिच्छा भेट दिली यावेळी सर्व पक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, अजहरभाई काझी, खलील मौलाना, जमीर बारूद, जाकिर शेख सर, राहुल उगले,जनता टेलर्स,पवनराजे राळेभात, शामिर सय्यद,भरतभैया जगदाळे, उमरभाई कुरेसी, मोहन पवार, मयुर भोसले, संतोष गव्हाळे, राणा सदाफुले, आशिफ शेख, मंजुर भाई, कल्लुचाचा, शेरखान भाई, नागनाथ मुरुमकर,भैया पठान,भैया तांबोळी, इम्रान कुरेशी,वसीम मंडप,ऋषी मीटके,संतोष वारे,(ZP सदस्य करमाळा) विक्की घायतडक सर,प्रितम घायतडक, पुरुषोत्तम गव्हाळे,राजेंद्र गोरे,इस्माईल सय्यद, ऋषीकेश नेटके,फिरोज बागवान,आज्युशेठ काझी,सज्जाद पठान व पत्रकार बंधु सह विविध मान्यवर सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेत्याच्या फराळाला कार्यकर्ते जातात हे नेहमीच बघायला मिळतं पण कार्यकर्त्याच्या फराळ कार्यक्रमाला नेता जाणे हे कधीतरीच घडतं, आरोग्य दुत, महायुतीचे आमदार आमदार निलेश लंके यांची जामखेड येथील कार्यकर्त्यांकडुन आयोजित फराळ कार्यक्रमाला उपस्थित राहत लोकनेता कार्यकर्त्यांच्या सुख दु:खात नेहमी बरोबर असतो हे दाखवून दिले आहे.
सर्व सामान्य जनतेसाठी कोरोना काळात केलेल्या कामांमुळे संपूर्ण राज्यात निलेशजी लंके यांचा आरोग्यदुत म्हणुन नाव लौकीक आहे.
आमदार निलेश लंके यांनी दहा दिवसांपूर्वी माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी उपस्थित राहत दोघांनी एकमेकांना गोड बालुशाही भरवली होती त्यावेळी संपूर्ण राज्यात याची चर्चा रंगली होती. लोकसभेची साखरपेरणी म्हणून आमदार प्रा. राम शिंदे किंवा आमदार निलेश लंके हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात. दोघांनीही तशी तयारी सुरु केली आहे.
आमदार निलेश लंके यांचा जामखेड परिसरात मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. दिवाळी फराळावेळी लंके यांना पुढील राजकीय प्रवासासाठी जामखेड करांनी शुभेच्छा दिल्या.