जामखेड न्युज——
शिवकुमार डोंगरे यांच्या वतीने शिवा संघटनेचे सहर्ष स्वागत
दहा वर्षांपासून जपली परंपरा
संपूर्ण महाराष्ट्रातून जामखेड मध्ये येणारे शिवा संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जय शिवा जय शिवा म्हणत सहर्ष स्वागत शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा शहर उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी केले स्वागत गेली 10वर्षापासून सेवा चालू आहे.
मन्मथ स्वामीच्या आशीर्वादाने पुढेही चालू ठेऊ शिवकुमार डोंगरे दर वर्षी प्रमाणे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शिवा संघटनेच्या मागणीनुसार संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधी कपिलधार येथे शासकीय महापूजा होते.
त्यानंतर संघटनेचा राज्य व्यापी महामेळावा होत असतो मनोहर धोंडे यांच्या अध्यक्षते खाली महा मेळावा असतो.
याच प्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजाची २२ वी शासकीय महापूजा व 28 वा राज्य व्यापी महामेळावा आज रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी श्री श्रेत्र कपिलधार येथील शिवा मैदानावर होत असतो.
यावेळी उपस्थित शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री तसेच आमदार खासदार उपस्थित असतात त्याचप्रमाणे गुरुवर्य अनेक शिवाचार्य शिवा संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते वीरशैव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
या मेळावा करता मुंबई ,ठाणे ,पालघर ,नाशिक, सातारा, या भागातील अनेक शिवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कपिलधार येथे जाण्यासाठी जामखेड मध्ये मुक्कामी येत असतात यावेळी जामखेड मध्ये स्नान पूजा चहा नाष्टा सोय शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा शहर उपाध्यक्ष श्री.शिवकुमार डोंगरे हे करत असतात.
यावेळी राज्य उपाध्यक्ष श्री.सुनील वाडकर आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर धोंडे यांच्या आदेशानुसार गेली 10 वर्षा पासुन काम करत आहेत त्यावेळी जामखेड मध्ये उपस्थित श्री.सुनील वाडकर नाशिक राज्य उपाध्यक्ष, श्री.रुपेश होनराव मुंबई राज्य सरचिटणीस, जगदीश मेनकुदळे जामखेड शिवा संघटना शहर अध्यक्ष,शांतेश्वर घुमटे पालघर जिल्हाध्यक्ष, शिवा बिराजदार ठाणे जिल्हाध्यक्ष, सुनील निदान सातारा जिल्हा अध्यक्ष, पांडुरंग माने,लिय्याकत शेख व शिवा संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते जामखेड मधून कपिलधार येथे जय शिवा जय शिवा जय घोष करत रवाना झाले यावेळी सुनील वाडकर व रुपेश होनराव यांनी शिवकुमार डोंगरे यांचे आभार मानले.