जामखेड न्युज——
नामदेव कडभने सरांचे अल्पशा आजाराने निधन
तालुक्यातील साकत (कडभनवाडी) येथील
नामदेव उत्तम कडभने सर (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले यामुळे साकत कडभनवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. अंत्यविधी आज
सायंकाळी ५.४५ वाजता कडभनवाडी येथे होईल.
नामदेव कडभने यांनी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक
जामखेड, श्रीरामपूर येथे नोकरी केली, त्यांच्या पत्नी प्रतिभा वराट (कडभने) याही रयत शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी केली त्याही सेवानिवृत्त झाल्या आहेत.
नामदेव कडभने सर काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना किडणीचा त्रास होता यातच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा वैभव हा डॉक्टर आहे तर मुलगी इंजिनिअर आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सुन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कडभने सर अभ्यासू , व्यासंगी प्राध्यापक आपल्या मधुन त्यांची ख्याती होती.