जामखेड न्युज——
जामखेड येथील सुप्रसिद्ध व्यापारी शिवचंद सुराणा यांचे निधन
जामखेड येथील राजमल, रतिलाल यांचे भाऊ आणि निर्मल (निमूसेठ ), विनोद, सौ विद्या हिरालाल संचेती बारामती यांचे पिताश्री चेतन, आदर्श यांचे दादाजी श्रीमान शिवचंदजी गुलाबचंदजी सुराणा यांचे आज मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निधन झाले.
ते जामखेड येथील जैन श्रावक संघाचे ट्रस्टी होते धार्मिक कामात सतत अग्रेसर असत गोरगरिबाला ते मदत करत असत.
त्यांचा अंतिम संस्कार बुधवार दिनांक २२/११/२०२३ रोजी सकाळी नऊ वाजता जामखेड येथील त्यांच्या निवासस्थान वरून अंतिम यात्रा निघून जामखेड येथील अमरधाम येथे अंतिम संस्कार होईल.