जामखेड न्युज——
शांतीनाथ ढवळे (आण्णा) यांचे अल्पशा आजाराने निधन
तालुक्यातील सावरगाव येथील शांतीनाथ ढवळे (आण्णा) वय 58 वर्षे पाच महिने यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आज सकाळी सावरकर येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जामखेड महाविद्यालयातील कर्मचारी, परिसरातील मित्रपरिवार तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांतीनाथ ढवळे हे जामखेड महाविद्यालय जामखेड च्या काँमर्स शाखेच्या पहिल्या बँचचे विद्यार्थी होते. तसेच महाविद्यालयालयीन शिक्षण संपले की, जामखेड महाविद्यालय जामखेड येथे क्लार्क म्हणून 1990 मध्ये नोकरीला लागले. सर्वांचे आण्णा म्हणून ते परिचित होते. सहकार्याची भावना त्यांच्या अंगी होती. मे 2023 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले होते.
मे महिन्यात ते वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना लिव्हरचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि अवघ्या साडेपाच महिन्यातच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी व मुलगा नोकरीला आहेत.