जामखेड न्युज——
जामखेडमध्ये भुजबळांच्या प्रतिमेला फाशी देत जोडे मारून निषेध

जामखेडमध्ये मराठा आरक्षणासाठी गेल्या पंचवीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. आज नाहुली गावाचे साखळी उपोषण होते. यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या कालच्या वक्तव्यचा निषेध म्हणून भुजबळाच्या प्रतिमेला फाशी देण्यात आली व नंतर अबाल वृद्धासह सर्वानीच जोडे मारून निषेध व्यक्त केला.

छगन भुजबळ यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे काल ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरले यामुळे मराठा समाजात प्रचंड राग असून राज्यात भुजबळ विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. जामखेड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण स्थळी भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो मारून फाशी देण्यात आली.

यावेळी शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तसेच नाहुली गावाचे जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, अँड नितीन घुमरे, विजय मोरे, भीमराव बहीर, देवराव जाधव, सुरेश बहिर, राजेश बहिर, माऊली बहिर, आण्णासाहेब बहिर, विश्वजित घुमरे सह नाहुली गावाचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

भुजबळ यांच्या जालन्यातील आक्रमक भाषणाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करुन छगन भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तर, मनोज जरांगे यांनी देखील राजकीय नेत्यांनी कितीही वक्तव्य केली तरी मराठा आणि ओबीसी समजात संघर्ष निर्माण होणार नाहीस असं म्हटलं.

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी असे विजय मोरे यांनी म्हटले आहे.

तर आता हिंदू- मुस्लिम दंगल होत नाही म्हणून भुजबळ नावाचे पिल्लू बाहेर काढले आहे. याच्या मागचा बोलविता धनी वेगळाच आहे. मुख्यमंत्री यांनी भुजबळ यांचा राजीनामा द्यावा असे कुंडल राळेभात यांनी सांगितले.





