भीषण अपघात घोगरगाव येथील युवकांचा जाग्यावरच मृत्यू, जामखेड येथील तीघे जखमी

0
2558

जामखेड न्युज ——-

भीषण अपघात घोगरगाव येथील युवकांचा जाग्यावरच मृत्यू, जामखेड येथील तीघे जखमी

चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणे गावानजीक वळणावर चारचाकी गाडी उलटल्याने एक जागीच ठार, तर तीनजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. मृताचे नाव अरुण मोरे (४५, रा. घोगरगाव, श्रीगोंदे) जखमी संदेश सुनील कोठारी (३९), रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा. (जामखेड) यांच्यावर चाळीसगावला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर जामखेड येथील रहिवासी चारचाकी गाडीने क्रमांक एम.एच. १६ सी.व्ही. २२७७ जळगाव येथून जामखेड येथे येत होते. दरम्यान, हिंगोणे (ता. चाळीसगाव ) जवळील वळणावर अचानक आलेल्या खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटून झाडावर आदळली.

गाडी झाडात अडकल्याने यातील प्रवाशांना बाहेर काढता येत नव्हते. दरम्यान, खासदार उन्मेष पाटील चाळीसगावकडे जात असताना ते घटनास्थळी थांबले. तत्काळ चाळीसगाव येथून रुग्णवाहिका व कटर मागविले.


गाडी कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढले. चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर यात अरुण मोरे (४५) रा. घोगरगाव यांचा मृत्यू झाला.

जामखेड येथील संदेश सुनील कोठारी (३९), रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा. (जामखेड) यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जामखेड येथील संदेश कोठारी यांच्या वर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी हाँस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here