जामखेड न्युज——-
गायवळ बंधूच्या आशिर्वादाने डॉ.विशाल वायकर यांची सोनेगावच्या सरपंच पदी बिनविरोध निवड
गावच्या विकासासाठी गटतट विसरून काम करणार – सरपंच डॉ. विशाल वायकर
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली समजल्या जाणाऱ्या सोनेगावच्या सरपंचाची निवड गायवळ बंधूच्या आशिर्वादाने आज दि. ९ रोजी डॉ.विशाल वायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सर्वच्या सर्व 9 सदस्य उपस्थित होते. निवड जाहीर होताच गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या व विकास कामांच्या माध्यमातून प्रगतीपथावर असणारी सोनेगाव ग्रामपंचायत ही महत्त्वाची मानली जाते. गेली अनेक वर्षांपूर्वी सोनेगाव या ठिकाणी राजकारणातून मोठा संघर्ष होऊन सततच्या गटबाजीमुळे धुमसत होती पण गायवळ बंधूच्या आशिर्वादाने बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे सोनेगाव विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आहे.
आज गुरूवार दि. ९ रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम होता. निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी एस एल नवले होते यांना सहाय्यक म्हणून ग्रामसेवक एस एस गदादे, व तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी काम पाहिले. विहित मुदतीत सरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने डॉ.विशाल राजेंद्र वायकर यांची बिनविरोध निवड झाली असे जाहीर करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ, माजी सरपंच रूपाली बिरंगळ, सुमन मिसाळ, रूक्मिणी बिरंगळ, सुनिता बोलभट, मनिषा वायकर, विलास मिसाळ, मारूती बोलभट, आश्रु खोटे सह सोनेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड जाहीर होताच गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी जामखेड न्युजशी बोलताना सरपंच डॉ. वायकर म्हणाले की. सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील गट तट विसरून गावाचा विकास करणार आहे. आणी सोनेगाव आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ म्हणाले की, डॉ. वायकर हे निःपक्षपाती काम करून गावचा विकास करणार आहेत. तसेच मी स्वतः गरजू व खरे लाभार्थी यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देणारच असे जामखेड न्युजशी बोलताना गायवळ यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ व प्रा. सचिन गायवळ यांनी गेली दहा वर्षापासून परिसरातील अनेक निवडी बिनविरोध करून ग्रामपंचायत वर पकड निर्माण केली आहे. त्यामुळे सतत गावात होणारा राजकीय संघर्ष बऱ्याच प्रमाणात कमी केला आहे. तसेच सोनेगाव मध्ये गायवळ बंधूंच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत व काही कामे प्रगतीपथावर आहेत.
यापूर्वी झालेली ग्रामपंचायत निवडणुकीत ही बिनविरोध केल्यानंतर सरपंच पदी सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांची निवड करण्यात आली होती. सौ. बिरंगळ यांनीही महिला सरपंच असूनही चांगली कामे केली होती. परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून आंतरवली सराटी जिल्हा जालना या ठिकाणी उपोषण सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा मिळत असताना सोनेगावच्या सरपंच सौ. रुपाली बिरंगळ यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरपंच पदाचा त्याग करून जामखेड येथील मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेत पाठिंबा देऊन सरपंच पदाचा राजीनामा प्रशासनाकडे सुपूर्द केला होता.त्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली होती,या राजीनाम्यामुळे रूपाली बिरंगळ या जामखेड तालुक्यात चर्चेत आल्या होत्या.