जवळा ग्रामपंचायतचा गड युवा नेते प्रशांत शिंदेनी राखला, मतेवाडीत सत्तांतर तर मुंजेवाडी भाजपाकडे

0
507

जामखेड न्युज——

जवळा ग्रामपंचायतचा गड युवा नेते प्रशांत शिंदेनी राखला, मतेवाडीत सत्तांतर तर मुंजेवाडी भाजपाकडे

 

जामखेड – तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या मंडळाने सरपंचपद व सदस्याच्या १५ पैकी १० जागा जिंकून सत्ता राखली तर सरपंच पदी पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष आव्हाड यांचे पुत्र सुशील आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.

मतेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस तर मुंजेवाडी ग्रामपंचायत भाजपने जिंकली. जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायत राजकीयदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतमध्ये भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना हे चारही पक्ष सक्रिय असतात. जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या विरोधात अनेक मातब्बर एकत्र आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट व सर्वपक्षीय आघाडीने एकास एक लढत दिली.

पाच वर्षात केलेले विकासकामे, जनतेशी असलेला सततचा संपर्क व युवा पिढी नी हाती घेतलेली निवडणूक तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष आव्हाड यांचा जनतेशी असलेला संपर्क यामुळे ही निवडणूक जिंकण्यात प्रशांत शिंदे यशस्वी ठरले. व ग्रामपंचायतची सत्ता काबीज केली.

सरपंचपदी सुशील सुभाष आव्हाड हे 650 मतांनी विजयी झाले. तर प्रशांत शिंदे यांच्या पत्नी शितल शिंदे हे सर्वाधिक 315 मतांनी सदस्यपदी विजयी झाल्या. विरोधी शेतकरी ग्रामविकास आघाडीला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.

मतेवाडीमध्ये ३० वर्षानंतर सत्तांतर मतेवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपच्या गेल्या ३० वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली. सरपंचपदी तात्या राजेंद्र कसरे विजयी झाले तर सात पैकी चार सदस्य निवडून आले. यूवा नेते भाऊसाहेब कसरे, नारायण पागीरे, संतोष पागीरे, अंकुश पागीरे, बबन पागीरे, सोमनाथ उर्फ पींटु पागीरे, आशोक मते, हूसेन शेख, आण्णा मते दत्तात्रय पागीरे, बजरंग डूचे ,मारूती पागीरे यांनी विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

मुंजेवाडी भाजपकडे
मुंजेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटात सरळ लढत झाली. सत्ताधारी महारनवर गटाने बाजी मारली. सरपंचपदी राणी महारनवर व पाच सदस्य विजयी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here