जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील 1586 मुलांनी दिली राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) परीक्षा
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) PARAKH – २०२३ सर्वेक्षण ३ नोव्हेंबर २०२३ रोजी शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या निवडक शाळांमध्ये घेण्यात आली. यासाठी तिसरी, सहावी व नववीचे वर्ग निवडण्यात आले होते. यासाठी यासाठी तिसरी 450, सहावी 594,नववी 542 असे एकूण 1586 मुलांनी परीक्षा दिली आहे.

परीक्षेचे नियोजन सुंदररितीने करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक तुषार तागड (साधन व्यक्ती जामखेड) यांनी तालुक्यातील 64 शिक्षकांची क्षेत्रीय अन्वेषक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांना प्रशिक्षण देऊन हि परीक्षा आज सुरळीत पार पडली

जामखेड तालुक्यातील साठ शाळा या परिक्षेसाठी निवडण्यात आल्या होत्या यातील इयत्ता तिसरी 18 शाळा, इयत्ता सहावी 22 शाळा तर इयत्ता नववी 20 शाळा अशा साठ शाळांमध्ये एकुण 1586 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

देशातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत राहण्यासाठी करिअरच्या दृष्टीने त्यांचे जीवन उज्ज्वल होण्यासाठी केंद्र व राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात विविध उपाययोजना करत आहे. यानुसार राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) PARAKH – २०२३ सर्वेक्षण ही परीक्षा घेण्यात आली आहे.




