जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरूच ठेवत पुढाऱ्यांना गाव बंदीही लागू

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी पुढील दोन महीने साखळी उपोषण सुरुच राहणार तसेच पुढाऱ्यांना गाव बंदी कायम असेल असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

आज दि ३ नोव्हेंबर २०२३ रोजी कुसडगाव येथिल मराठा बांधवांचे जामखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. उपोषण स्थळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे व ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेले अंतरवली सराटी या ठिकाणचे आमरण उपोषण नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले आहे.

शासनाला दोन महिन्याची मुदत देऊन ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात शेवटचा अल्टिमेट दिला आहे. मात्र उपोषण जरी सुटले आसले तरी महाराष्ट्रात मराठा समाजाचे साखळी उपोषणे सुरूच रहाणार आहेत.

याच अनुशंगाने जामखेड व विविध गावात असलेले साखळी उपोषण देखील सुरुच ठेवण्याचे व पुढाऱ्यांना गाव बंदी कायम लागूच ठेवण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे. यानुसार आज कुसडगाव ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील रणरागिणीही मैदानात उतरल्या आहेत महिलांनीही एक दिवस उपोषण, कँडल मार्च तसेच जामखेड शहरात रास्ता रोको आंदोलन केले होते.



