Saturday, March 28, 2026
Home ताज्या बातम्या मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात महिलाही मैदानात, महिलांचे उपोषण सुरु

मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात महिलाही मैदानात, महिलांचे उपोषण सुरु

0
893

जामखेड न्युज——

मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात महिलाही मैदानात, महिलांचे उपोषण सुरु

 

 

 

मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यात गेल्या आहे पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. आज जामखेड मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महिलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. यामुळे आरक्षणासाठी दिवसेंदिवस वातावरण तप्त होत चालले आहे. 


शिर्डीतील पंतप्रधान मोदींच्या सभेकडे तालुक्यातील गावकऱ्यांनी पाठ फिरवली होती गाड्या रिकाम्या परत लावल्या होत्या आणि आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ५८ ग्रामपंचायती पैकी ४५ ग्रामपंचायत हद्दीत सध्या राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी बोर्ड लागले आहेत. उर्वरित ग्रामपंचायत मध्ये दोन दिवसात लागतील म्हणजे जामखेड तालुक्यात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी असेल. आता तर महिलांनीही मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे.

 

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला दिलेली मुदत संपली राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे दुसऱ्यांदा जरांगे पाटीलांनी उपोषणाला सुरूवात केली आहे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून जामखेड तालुक्यात साखळी उपोषण सुरु आहे. तसेच मोदींच्या सभेकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवली होती गाड्या रिकाम्या परत लावल्या होत्या आणि आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आता तर महिलाही आरक्षणासाठी मैदानात उतरल्या आहेत.

जामखेड तालुक्यात आरक्षणासाठी वातावरण तप्त होऊ लागले आहे. साखळी उपोषण सुरु आहे. दिवसभर एका गावातील लोक उपोषण करतात. आज महिलांनी दिवसभर साखळी उपोषण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!