अमित चिंतामणी जामखेडचा हिरा – डॉ. भगवान मुरूमकर सुकन्या कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नगरसेवक अमित चिंतामणी आयोजित ओपन गरबा दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

0
152

जामखेड न्युज——

अमित चिंतामणी जामखेडचा हिरा – डॉ. भगवानराव मुरूमकर

 

सिनेअभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नगरसेवक अमित चिंतामणी आयोजित ओपन गरबा दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

 

नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या काळात आपला प्रभाग विकासाच्या बाबतीत क्रमांक एकवर ठेवला. मुंबई चा मलबार हिल जसा आहे तसाच जामखेडचा प्रभाग तेरा आहे. अमित चिंतामणी हा खरोखरच जामखेडचा हिरा आहे असे मत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी व्यक्त केले. 

सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा उत्सवा निमित्त जामखेड येथिल नगरसेवक अमित चिंतामणी यांनी महीलांसाठी शनिवार दि २८ रोजी ओपन गरबा दांडियाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी ”बाईपण भारी देवा फेम सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने व अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला  यावेळी आशाताई शिंदे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, मुख्याधिकारी अजय साळवे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ, एवन टेक्सटाईलचे संचालक विनायक राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, डॉ. भगवानराव मुरूमकर, मंगेश आजबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिन घुमरे, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, अशोक शिंगवी,सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,बिभीषण धनवडे, बापुराव ढवळे, मनोज कुलकर्णी, सोमनाथ पाचारणे, सुरेश पवार, प्रकाश दहिवळकर, अंजलीताई चिंतामणी, प्राजंलताई कुलकर्णी, अर्चनाताई राळेभात, ऋषिकेश डुचे, प्रविण सानप, काका गर्जे, उद्धव हुलगुंडे, नानासाहेब गोपाळघरे, केशव वनवे, अनिल यादव, फिरोज कुरेशी, जाकिर शेख, जमीर बारूद, नंदकुमार गोरे, डॉ. गणेश जगताप, केदार रसाळ, मोहन देवकाते, प्रविण चोरडिया, अल्ताफ शेख, अभिजीत राळेभात, संतोष गव्हाळे, डॉ. कल्याण काशिद, संजिवनी पाटील, मनिषा सरवसे, बिट्टू मोरे यांच्या सह माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की, कर्जत जामखेड तालुक्यातील महिला लई भारी आहेत बाहेरच्या महिलांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. 

यावेळी शरद कार्ले, अजय साळवे, अजय काशिद
शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी मोने यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या की,
प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आम्ही अभिनय क्षेत्रात भरारी घेतली आहे. मराठी सिनेमा लावण्यासाठी प्रेक्षकांनी आग्रह केला पाहिजे, मराठी चित्रपट थेटर मधेच पहा त्यामुळे त्याशिवाय मराठी चित्रपटांचे दिवस येणार नाहीत. महिलांशी बोलताना सांगितले की आजची महिला घर चालवते तीच महिला राजकारण पण संभाळु शकते असे मत सुकन्या कुलकर्णी – मोने यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी ”बाईपण भारी देवा फेम सिने अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने व अभिनेत्री शिल्पा नवलकर उपस्थित राहून जामखेड मधील महिला भगिनींसोबत दांडियाचा आनंद घेतला. 

या गरबा दांडियाचे आयोजक अमित चिंतामणी हे विविध सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. त्या अंतर्गतच गेल्या आठ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबवित असतात. त्यानुसारच याही वर्षी ओपण गरबा दांडीया आयोजन केले होते यामध्ये नक्षत्र मंगळागौर ग्रुप, पुणे यांचा गरबा दांडिया कार्यक्रम झाला.

चौकट

दर्जेदार विकास कामांसोबत मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविणारे नगरसेवक म्हणून अमितची ओळख

जामखेड शहरातील सर्वात दर्जेदार कामे असणारा प्रभाग म्हणून अमित चिंतामणी यांचा प्रभाग तेरा ओळखला जातो. नगरसेवक म्हणून प्रभागातील नागरिकांना दिलेले आश्वासन व नागरिकांची मागणी यानुसार प्रभागातील १०० टक्के कामे पूर्ण केली आहेत. काही कामे तर पदरमोड करून पुर्ण केलेली आहेत. सिमेंट किंवा पेव्हिंग ब्लॉक असणारे रस्ते, भुमीगत गटारे अशी अनेक कामे तीही दर्जेदार असा प्रभाग तेरा आहे. विकास कामांसोबत दरवर्षी मनोरंजनात्मक विविध कार्यक्रम चिंतामणी यांच्या मार्फत राबवले जातात

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here