जामखेड न्युज——
अण्णांच्या पुण्याईमुळे एवन टेक्सटाईल उंच भरारी घेणारच – सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते एवन टेक्सटाईलचे शानदार उद्घाटन संपन्न
जामखेड शहरात वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी एकमेकांना सहकार्य करतात यामुळे जामखेडची व्यापारी पेठ अग्रेसर आहे. जामखेडचा हा गुण चांगला आहे. वै. विठ्ठल आण्णा राऊत यांचे कार्य सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी होते. त्यांचे आशिर्वाद मिळणार आहेत त्यांमुळे अल्पावधीतच
एवन टेक्सटाईल उंच भरारी घेईल असा विश्वास सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर एवन टेक्सटाईलचा भव्य शुभारंभ सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते तसेच खासदार डॉ सुजय विखे पाटील, अखिल भारतीय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले, प. पू. पांडुरंग शास्त्री देशमुख, हभप रामकृष्ण महाराज रंधवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रा. मधुकर राळेभात, संजय वराट, डॉ. भास्कर मोरे, रमेश गुगळे, अमित चिंतामणी, डॉ. भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, सोमनाथ पाचारणे, मनोज कुलकर्णी, प्रा. अरूण वराट, सुरेश भोसले, ज्ञानदेव कुंभार, गौतम उतेकर, आण्णासाहेब सावंत, लहू शिंदे, नारायण राऊत, महेश राऊत, डॉ. रोहन बोराटे, सुर्यकांत मोरे, अनंता खेत्रे, कविता जगदाळे सह राऊत व बोराटे कुटुंबांवर प्रेम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, जामखेड ची ओळख चांगली बाजारपेठ म्हणून नावारूपाला येत आहे आणि आता राऊत व बोराटे कुटुंबांनी एवन टेक्सटाईलच्या रूपाने जामखेडच्या वैभवात भर पडणार आहे.
यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील
म्हणाले की, आण्णा व विखे पाटील घराणे यांचा संबंध खुप जुना आहे. अण्णांच्या आशिर्वादाने जामखेड परिसरात एवन टेक्सटाईल च्या रूपाने
नवे दालन सुरू होत आहे. यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना रत्नदिप मेडिकल फाउंडेशनचे
डॉ. भास्कर मोरे यांनी सांगितले की, जामखेड परिसरातील लोकांची गरज ओळखून जामखेड शहरात एवन टेक्सटाईल सुरू केले. तरूण वर्गाला काय हवे तेच एवन टेक्सटाईल च्या रूपाने राऊत व बोराटे यांनी सुरू केले आहे.
यावेळी उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, आम्ही पन्नास वर्षापासून कापड व्यवसायात आहोत. रोज नवनवीन गोष्टी रोज येतात. एवन टेक्सटाईल ला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन गुगळे यांनी दिले.
हभप रामकृष्ण रंधवे महाराज यांनी सांगितले की,
बंधुप्रेम बोराटे यांच्या कडून शिकावे, एवन टेक्सटाईलने चांगली सेवा द्यावी ग्राहक आपोआप येतील व्हरायटीत कमी पडू नका जामखेड शहराच्या वैभवात भर पडणारे दालन आहे. ग्राहकांना देव समजा तुमचा व्यापार वाढणार आहे.
यावेळी आखील भारतीय वारकरी शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले म्हणाले की, जामखेड च्या वैभवात भर घालणारे वातानुकूलित असे एवन टेक्सटाईल झाले आहे.
राऊत आण्णानी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जपला अण्णांच्या प्रेमामुळे बहुसंख्य लोक जमले आहेत. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर
राऊत व बोराटे कुटुंबांनी एवन टेक्सटाईलच्या रूपाने सिमोलंघन केले आहे.
प्रस्ताविक करताना विनायक राऊत म्हणाले की,
अण्णांचे स्वप्न साधू नाना बोराटे यांच्या सहकार्याने एवन टेक्सटाईलचे दालन सुरू करत पुर्ण करत आहोत. हे दालन आपले सर्वांचे आहे. प्रत्येकाला आपले वाटेल अशी सेवा देऊ असे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार विनायक राऊत यांच्या भगिनी भाग्यश्री राऊत यांनी मानले.