जामखेड न्युज——
जामखेड महाविद्यालयातील खेळाडूंची आंतरमहाविद्यालयीन अँथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री विखे पाटील आर्टस् सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय प्रवरा नगर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन अँथलेटिक्स स्पर्धेत जामखेड महाविद्यालयातील खेळाडूंनी अप्रतिम खेळाच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामुळे यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जामखेड महाविद्यालयातील खेळाडूंची चमकदार कामगिरी
1) धनलगडे उपेश (रौप्य पदक)गोळा फेक
2) धनलगडे ऋषीकेश (रौप्य पदक) थाळी फेक
3) मुळे सागर बंडू (कास्य पदक) भाला फेक
4) धनलगडे उपेश (कास्य पदक) थाळी फेक,
या सर्व खेळाडूंनी प्रति स्पर्धकावर मात करून पदक संपादन केले आहे.
वरील सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष अरुण (काका) चिंतामणी, संस्थेचे सचिव शशिकांतजी देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल.डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, अविनाश फलके यांच्या सह मित्रमंडळी नातेवाईक व मार्गदर्शक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
त्यांचे मार्गदर्शक डॉ. अण्णा मोहिते यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डोंगरे एम.एल. म्हणाले की महाविद्यालयाच्या नाव लौकीकात भर घालणाऱ्या या सर्व यशस्वी खेळाडूंचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. 1व 2 नोव्हेंबर रोजी पुणे येथे संपन्न होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
नजीकच्या काळात होणाऱ्या नॅक् साठी या सर्व बाबींची निश्चितच मोलाची भर पडणार आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सर्वांचे उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, कला विभाग प्रमुख प्रा.फलके, नॅक् कॉर्नेटर प्रा गाडेकर तसेच सर्व संचालक मंडळ व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.