डॉ सागर शिंदे यांनी स्विकारले शेकडो अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात निर्माण केला वेगळा ठसा

0
788

जामखेड न्युज ——-

डॉ सागर शिंदे यांनी स्विकारले शेकडो अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व

वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात निर्माण केला वेगळा ठसा

 

डॉ सागर शिंदे यांचे जामखेड परिसरात एक हुशार दंतचिकित्सक म्हणून ख्याती आहे याच बरोबर आपल्या कार्याने सामाजिक क्षेत्रात आपला ठसा निर्माण केला आहे. आतापर्यंत अनाथ गोरगरीब अशा शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलला आहे यावर्षी बारा विद्यार्थ्यांची शैक्षणिक फि, शालेय गणवेश व साहित्य वाटप केले आहे. यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील व आई वडिलांच्या विचारांचा वारसा डॉ. सागर शिंदे पुढे चालवत आहेत.

डॉ सागर कुंडलिकराव शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय येथील आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. यावर्षी 12 अनाथ विद्यार्थ्यांना गणवेश दप्तर,वह्या सर्व शैक्षणिक साहित्य वितरित करून परीक्षा शुल्काचे दहा हजार रुपयांचा धनादेश विद्यालयाकडे सुपूर्त केला. याबद्दल विद्यालयाचा वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे अनाथ मुलांना शिक्षणासाठी पाठबळ मिळाले आहे. डॉ. सागर शिंदे यांचे खरे सामाजिक काम याद्वारे दिसून येत आहे.


जामखेड तालुक्यातील मागील अकरा वर्षापासून हेल्थ दातांचा दवाखाना आणि सुपर स्पेशलिटी डेंटल क्लिनिक या मार्फत डॉ.सागर कुंडलिक शिंदे MDS ( Gold medalist) आणि त्यांच्या पत्नी डॉ. मयुरी सागर शिंदे (BDS) दंतशल्य विशारद हे दातांच्या दवाखान्याच्या माध्यमातून गरजू पेशंटला सुविधा पुरवत आहेत. डॉ. शिंदे आणि मयुरी शिंदे हे दोघेही अत्यंत हुशार आणि अनुभवी डॉक्टर आहेत त्याचप्रमाणे जामखेड मध्ये होणाऱ्या सार्वजनिक आणि सामाजिक कामांमध्ये ते हिरारीने भाग घेतात. मोफत दंततपासणी शिबीर, तसेच शेकडो अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारून त्यांचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलला आहे. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत म्हटले जाते. अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे.


डॉ सागर शिंदे यांच्या जामखेड ला येण्याआधी
MDS डॉक्टर नसल्यामुळे पेशंटला नगरला किंवा बीड, पुण्याला जावे लागत असे. मात्र डॉक्टर सागर शिंदे यांच्या येण्यामुळे ही पोकळी भरून निघाली आणि हजारो पेशंटचा फायदा झाला. आज नवनवीन तरुणांना ज्यांचे दात वेडेवाकडे आहेत किंवा ज्यांना दातामुळे हसता येत नाही अशा अनेक लोकांना ऑर्थरोटिक ट्रीटमेंट म्हणजे दातांना तारा लावणे या मार्फत , त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात यशस्वी झाले आहेत.


डॉक्टर मयुरी शिंदे याही अतिशय हुशार डेंटिस्ट आहेत, महिलांमध्ये डॉक्टर मयुरी शिंदे यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या पद्धतीचे खूप कौतुक केले जाते, आज पैसे भेटतील ना भेटतील ,,परंतु पेशंटच्या दातांच्या वेदना बंद करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून त्या काम करत असतात. याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.

डॉ. सागर शिंदे व डॉ. मयुरी शिंदे यांची समाजसेवा

हेल्थ दातांचा दवाखाना सुपर स्पेशलिटी डेंटल क्लिनिक या मार्फत डॉक्टर सागर शिंदे आणि मयुरी शिंदे यांनी अनेक फ्री डेंटल चेकअप घेतले आहेत. आज पर्यंत त्यांनी बारा फ्री डेंटल चेक अप कॅम्प आणि जामखेड मधील पाच शाळांना डेंटल कॅम्प आणि दवाखान्या मार्फत मार्गदर्शन आणि टूथपेस्ट आणि ब्रश दिलेली आहेत. लहान मुलांमध्ये दात स्वच्छ ठेवण्याची भावना रुजावी आणि त्यांना सवय लावावी यासाठी हे कॅम्प घेतले जातात.

एक सेवाभावी उपक्रम

मागील सात वर्षापासून जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय येथील गरीब व अनाथ मुलांना त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांच्या शिक्षणाचा भार यांनी उचललेला आहे. आत्तापर्यंत शेकडो अनाथ मुलांना डॉक्टर शिंदे यांनी मदत केलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि आई-वडिलांनी दिलेल्या समाजसेवेचा वारसा ते पुढे चालवत आहेत.

डॉ. सागर कुंडलिक शिंदे हे गेली 10 वर्षे दाताच्या समस्यांसाठी सेवा देताना सुसज्ज हाॅस्पिटलच्या माध्यमातून अ‍ॅडव्हान्स रूट कॅनाल(RCT), आर्थोडोटीक ट्रिटमेंट व डेंटल इम्प्लान्ट , लहान मुलांच्या दातांचे रोड काम करणे, सेवेसाठी सतत प्रयत्नशील असतात.
पक्के कृत्रिम दंतरोपण
स्क्रूच्या साहाय्याने पक्के दात बसवणे (डेंटल इम्प्लांन्ट)
दातांना तार बसवून दात सरळ करणे व दातांमधील गॅप बंद करणे
काॅस्मेटीक डेंटिस्ट्री , स्माईल डिझाईनिंग
ओपीजी एक्सरे: जामखेड मधील प्रथमच ओपीजी एक्सरे मशिन डॉक्टरांनी घेतली.
जबड्याचे फ्रॅक्चर काढणे, गाठी काढणे, कॅन्सर निदान दात स्वच्छ करणे, दंत व्यंगोपचार दातांना तार बसवून दात सरळ करणे व दातांमधील गॅप बंद करणे.

चांगल्या दातांच्या आरोग्यासाठी डॉ. सागर शिंदे लोकांना आवाहन केले आहे की
1.व्यसनमुक्त राहणे – तंबाखू, सिगारेट, मावा यापासून दूर राहणे,
2.दाताची स्वच्छता – ब्रश, माउथ वाॅश, 3.डेंटल फ्लॉस नियमित वापरणे,
4.ब्रश तीन महिन्याला बदलणे
5.प्रत्येक जेवणानंतर चुळ भरणे
वेडेवाकडे दात सरळ करणे, यामुळे दात स्वच्छ करणे सोपे जाते
दात नसल्यास दात बसवून घेणे यामुळे बाकी दातांचे आरोग्य चांगले राहते
किडलेल्या दातावर त्वरीत उपचार करणे दुसरे दात किडत नाहित
नियमितपणे सहा महिन्यातून एकदा दाताच्या डॉक्टर कडून तपासणी करून घेणे
अशा प्रकारे काळजी घेतली तर आपल्या दातांचे सौंदर्य अधिक चांगले दिसते.

ठळक वैशिष्ट्ये

अत्यंत आधुनिक पद्धतीने दातांच्या इन्स्ट्रुमेंट चे व साधनांची निर्जंतुकीकरण केले जाते.

सर्व उपचार स्पेशल MDS डॉक्टर मार्फत केले जातात.

लेझर आणि कॉटर ट्रीटमेंटच्या सुविधा उपलब्ध.
अत्यंत उच्च प्रतीचा डेंटल असिस्टंट चा स्टाफ आहे त्यामुळे पेशंटला उपचारानंतरच्या सूचना आणि काळजी व्यवस्थित घेतली जाते.

डॉक्टर स्वतः एमडीएस असल्याने हिरड्यांचे ऑपरेशन करणे, तोंडात जबड्यावर आणि चेहऱ्यावर असलेल्या गाठी काढणे, अडकलेली जिभेची कातडी वरती उपचार करणे. इत्यादी उपचार केले जातात. डॉ. सागर शिंदे व डॉ. मयुरी शिंदे यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दंतसेवेबरोबरच सामाजिक कार्यात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here