जामखेड न्युज——
वडिलांच्या अस्तीचे पाण्यात विसर्जन न करता लावले झाड
घोडेस्वार बंधुंचा आधुनिक विचार
जामखेड तालुक्यातील साकत येथील परमेश्वर निवृत्ती घोडेस्वार (वय ५३) यांचे साकत येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आज सावडण्याचा कार्यक्रम होता. यानंतर परंपरेनुसार रक्षा विसर्जन पाण्यात करतात पण घोडेस्वार बंधूंनी पाण्यात रक्षा विसर्जन न करता आधुनिक विचार अंगिकारत स्मशानभूमी परिसरात वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ झाड लावले आहे.
यामुळे परिसरात प्रशांत घोडेस्वार व प्रदिप घोडेस्वार बंधूंच्या आधुनिक विचारांचे स्वागत केले जात आहे.
साकत येथे गावातील तरूणांनी एकत्र येत लोकवर्गणी करत स्मशानभूमी परिसराची स्वच्छता केली व परिसराला कंपाऊंड केले तहसीलदार व कृषी अधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे तरूणांच्या कामाचे सगळीकडे कौतुक झाले होते. याच परिसरात प्रशांत व प्रदिप घोडेस्वार यांनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ झाड लावले आहे.
परमेश्वर घोडेस्वार यांनी शुक्रवारी दिवसभर शेतात पेरणीचे काम केले होते सायंकाळी घरी आल्यावर गावात शेंगदाणे घेण्यासाठी दुकानात आले शेंगदाणे घेऊन घरी निघाले असता दुकानासमोरच चक्कर आली आणी खाली पडले ताबडतोब त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे साकत परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात आली होती आज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ झाड लावले आहे. वडिलांच्या स्मृती झाडाच्या रूपाने कायम राहणार आहेत.
परमेश्वर घोडेस्वार हे कपडे शिवण्याचे कामही करत होते. यामुळे ते टेलर नावाने परिचित होते. त्यांनी कष्ट करून आपल्या तिनही मुलांना उच्च शिक्षित केले थोरला मुलगा प्रशांत हा पुणे येथे इंजिनिअर आहे. दुसरा मुलगा प्रदिप हा एमएस्सी झालेला आहे तसेच मुलगी प्रांजली हिपण उच्च शिक्षित आहे. तिनही मुले खुपच गुणी आहेत. आज वडिलांच्या स्मृती झाडाच्या रूपाने जतन केल्या आहेत.