शिवसेना तालुकाप्रमुख व भाजपा तालुकाध्यक्ष यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांचा सन्मान शैक्षणिक गुणवत्तेसाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या शाळा भेटी

0
221

जामखेड न्युज——

शिवसेना तालुकाप्रमुख व भाजपा तालुकाध्यक्ष यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांचा सन्मान

शैक्षणिक गुणवत्तेसाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या नियमित शाळा भेटी

 

जामखेडचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत शाळा भेटी देऊन शिक्षकांना नेहमीच योग्य त्या सूचना देत असतात असेच शाळा भेटी दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद व भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या नियमित शाळाभेटी व शिस्त यामुळे तालुक्यातील सर्व शिक्षक नियमितपने शालेय वेळेच्या आधी एक तास उपस्थित राहून जादा तास घेत आहेत. यामुळे तालुक्यातील विद्यार्थीच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली आहे.एकंदरीत तालुक्यातील गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे मोठे समाधान वाटत आहे. असे मत भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी व्यक्त केले.

जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे दररोज वेगवेगळ्या शाळांना भेटी देत असल्याने मुलांच्या गुणवत्तेत चांगली सुधारणा झाली असल्याचे दिसून येत आहे. आज दि. १७ रोजी सकाळी शाळाभेटी सत्रा दरम्यान लोणी फाटा येथे जामखेड तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अजय (दादा) काशीद, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काशीद यांनी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी नायगांव ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, नितिन ससाने, उगलेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक केशवराज कोल्हे, विवेक उगले, मंगेश वारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संजय काशीद यांनी शिक्षकांसोबतच शाळेला भेट देणारे बाळासाहेब धनवे हे पहिले गटशिक्षणधिकारी आहेत. असे सांगत समाधान व्यक्त केले. यामुळे तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here