जामखेड न्युज——
जामखेडचे माजी उपसरपंच बाळासाहेब राळेभात यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन
जामखेडचे माजी सरपंच बाळासाहेब राळेभात (डेप्युटी) वय ४५ यांचे आज सकाळी दुखद निधन झाले. निधनाची बातमी समजताच राळेभात कुटुबीयांवर व मित्र परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तपनेश्वर येथील अमरधाम मध्ये सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
जामखेड येथील रहिवासी असलेले बाळासाहेब राळेभात अतिशय तरुण वयामध्ये जामखेड ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सुनील कोठारी सरपंच असताना त्यांना उपसरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तरुण वर्गातच नव्हे तर जामखेड मधील सर्वांचेच ते परिचित होते त्यांचा मित्रपरिवार ही मोठा होता.
शुक्रवारी रात्री त्यांना अचानक हृदय विकाराचा त्रास झाला त्यानंतर त्यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु पहाटे सहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बाळासाहेब राळेभात यांच्या मागे आई-वडील अर्जुन राळेभात, बळीराम राळेभात व उद्धव राळेभात हे दोघे भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. अतिशय कमी वयामध्ये चालता बोलता एका तरुणाचे निधन झाल्याची वार्ता जामखेडमध्ये आज वाऱ्यासारखी पसरत आहे व सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचे वडील जामखेड महाविद्यालय जामखेड येथे नोकरीस होते त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन भाऊ एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.