जामखेड न्युज——
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत उठलेल्या अफवेवर विश्वास ठेवू नका
सर्वाच्या ठेवी सुरक्षित आहेत – सचिन खांडे
जामखेड सह इतर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत अफवा उठवली जात आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका, जामखेड व इतर सर्वच ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ज्यांचा विश्वास नसेल ते आपल्या ठेवी कधीही घेवून जावू शकता. फक्त गर्दी करू नका आणि शिस्तीमध्ये घेवून जाव्यात असे आवाहन जामखेड ज्ञानराधा बँकेचे व्यवस्थापक सचिन खांडे यांनी केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, तिरूमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपासणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या बाबत बाहेर काही अफवा पसरविण्यात आल्या आहेत. पण तिरुमला व ज्ञानराधा या वेगवेगळ्या संस्था आहेत फक्त मालक एक आहे.
आयकर विभागाच्या या तपासणी नियमित असतात. या तपासणीचा आणि उठवलेल्या अफवांचा संबंध लावून ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी आज दिवसभर मोठी गर्दी करत आहेत. तुमच्या ठेवी आहेत त्या काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे.
आणि तुम्ही जेव्हा बँकेमध्ये काढून घेण्यासाठी येताल तेव्हा त्या ठेवी आपणास सन्मानाने परत मिळतील. कारण बँक सुस्थितीमध्ये आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, ठेवीदारांना एकच विनंती आहे आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नका, शिस्तीमध्ये काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा, आपल्या ठेवी काढून घेताना कोणतीही आडकाठी मध्ये येणार नाही हा विश्वास बँकेचे व्यवस्थापक सचिन खांडे यांनी दिला.
कुटे ग्रुपच्या मालकीची असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या मागचे कारण म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बुडाली, या आशयाच्या चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळताय. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता बँकेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांनीही ‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल तेव्हा तुमचे पैसे आम्ही देऊ’, असं स्पष्ट केलं आहे. यामुळे ग्राहकांनी नाहक गर्दी करू नये सर्वाच्या ठेवी सुरक्षित आहेत. असे सुरेश कुटे यांनीही सांगितले आहे.