जामखेड न्युज——
जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धेत जामखेडच्या श्रेयस वराट,अदित्य जायभाय व योगेश वाघमोडे ला सुवर्णपदक
पुणे विभागीय शालेय वुशु स्पर्धेसाठी निवड

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,व जिल्हा क्रीडा परिषद अ.नगर आणि अ.नगर जिल्हा वुशु संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल, कोपरगाव येथे आज दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय शालेय वुशु स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत श्रेयस वराट, आदित्य जायभाय योगेश वाघमोडे यांनी सुवर्णपदक मिळवले तर सोहेल रियाज शेख व पृथ्वीराज पंडित यांनी रौप्य पदक तर विजय जायभाय याने कांस्य पदक मिळविले. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेमध्ये श्रेयेश सुदाम वराट याने सुवर्णपदक व पृथ्वीराज पंडित याने रौप्यपदक मिळविले दोघेही श्री नागेश विद्यालय जामखेड येथील विद्यार्थी आहेत तर अदित्य अजिनाथ जायभाय व योगेश वाघमोडे याने सुवर्णपदक तर सोहेल रियाज शेख यांनी रौप्य पदक मिळविले तिघेही ल.ना. होशिंग विद्यालय, जामखेड येथील विद्यार्थी आहेत.

अदित्य, श्रेयस व योगेश यांची पुणे विभागीय शालेय वुशु स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
सर्व खेळाडूंचे अभिनंदन आमदार रोहित पवार, विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, उमेश देशमुख, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. के. मडके, मा. प्राचार्य श्रीराम मुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती कैलास वराट, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, माजी सभापती संजय वराट सह तालुक्यातील पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुणे विभागीय शालेय वुशु स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



