जामखेड न्युज——
श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर
श्री साकेश्वर विद्यालयाचे शिस्तप्रिय म्हणून ख्याती असलेले मुख्याध्यापक दत्ता काळे यांना अहमदनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. २९ रोजी आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे संपन्न होणार आहे.

अहमदनगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शुक्रवार दि २९ रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय टिळक रोड अहमदनगर येथे एकदिवसीय चर्चासत्र व गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार वितरण होणार आहे. याच वेळी दत्ता काळे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, सरचिटणीस बाळासाहेब कळसकर, कोषाध्यक्ष मंगेश जाधव, ज्ञानदेव बेरड, बाळासाहेब सुर्यवंशी, मिथुन डोंगरे, निवृत्ती झले, राजेंद्र वाघ, रंजना रहाणे, राजेंद्र सोनवणे, सचिन धुमाळ, शितल बांगर तसेच सर्व जिल्हा कार्यकारीणी व तालुका प्रतिनिधी मुख्याध्यापक संघ उपस्थित राहणार आहेत.

दत्ता काळे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर होताच दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान सह सर्व संचालक मंडळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, जामखेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दशरथ कोपनर, सचिव आप्पासाहेब शिरसाठ, प्राचार्य श्रीकांत होशिंग, मुख्याध्यापक संजय वराट, श्रीधर जगदाळे, रमेश अडसुळ, शंकर खताळ, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर, प्रा. अरूण वराट जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरूमकर, गणेश वराट, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, वसमत जि. परभणी येथील उपअभियंता अक्षय पवार, उस्मानाबाद येथील महादेव पवार, माजी एपीआय सुभाष चव्हाण, जीवन चव्हाण, १९९७-९८ चा काळे सरांचा बीएड गृप, भरत लहाने, राजेंद्र पवार, शहादेव वराट, राजेंद्र उदावंत, खंडू भुजबळ, पोलीस पाटील महादेव वराट, रामचंद्र वराट गुरूजी, संभाजी पवार, श्री साकेश्वर विद्यालयाचा सर्व स्टाफ यांच्या सह अनेक हितचिंतक मित्रमंडळी यांनी काळे सरांचे अभिनंदन केले आहे.

दत्ता काळे यांनी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या भैरवनाथ विद्यालय हळगाव येथे १९९८ मध्ये सहशिक्षक म्हणून सेवा सुरू केली. २०११ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल राजुरी येथे मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली २०१७ मध्ये श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे बदली ते आजतागायत साकत येथे आहेत. दत्ता काळे हे एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून परिचित आहेत. तसेच शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक कामात ते नेहमीच अग्रेसर असतात. विद्यार्थी हितासाठी नेहमी तळमळ असते. त्यांना २०१३-१४ मध्ये अहमदनगर सह्याद्री उद्योग समूहाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला होता.
काळे सरांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




