जामखेड न्युज——
भुतवडा जिल्हा परिषद शाळेने सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवली पंचवीस हजार रुपयांची मदत
सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा या शाळेस इन्वर्टर बॅटरी साठी पंचवीस हजार रुपयांची मदत मिळवली आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करत शाळेसाठी मदत मिळवल्यामुळे शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा शाळेत चालू असलेल्या विकास कामासंबंधी सोशल मीडियावर(WhatsApp) मदतीचे आवाहन केल्यानंतर पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीत कार्यरत असलेल्या मित्र परिवार SOCIAL RESPONSIBILITY GROUP PUNE हा ग्रुप चालवतात.
त्या ग्रुपला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुतवडा शाळेविषयी समजल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री बळीराम जाधव सर यांना संपर्क करून शाळेविषयी बरीच माहिती जाणून घेतली आणि आज प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली शाळेत विविध राबवले जाणारे उपक्रमाची माहिती करून घेतली चालू असलेल्या विकासकामाविषयी ग्रामस्थांकडून जाणून घेतले आणि शेवटी शाळेला पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम देऊन शाळेचे,विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थाचे कौतुक केले. सर्व देणगीदारांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले.