आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे वनविभागाच्या परवानगी अभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना वनविभागाचा हिरवा कंदील

0
150

जामखेड न्युज  ——–

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नामुळे वनविभागाच्या परवानगी अभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना वनविभागाचा हिरवा कंदील

 

कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये वनविभागाची परवानगी मिळाली नसल्यामुळे वनपरिक्षेत्रातील काम पूर्ण करण्यात अडथळा निर्माण झाला होता. परंतु, अखेर हा तिढा सुटला असून वनविभागातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी मंत्री महोदय, अधिकारी यांची भेट घेऊन केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सदरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाला आता वनविभागाने हिरवा कंदील दाखवत मंजुरी दिली आहे.

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू ते कोपर्डी या मार्गाच्या अंतर्गत चांदे खुर्द, चांदे बुद्रुक व बिटकेवाडी हा भाग वनपरिक्षेत्रात येत आहे तसेच मिरजगाव ते नांदगाव या मार्गात हंडाळवाडी हा भाग वनपरिक्षेत्रात येतो. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग क्र.१४१ निमगाव गांगर्डा ते चिंचोली रमजान ते कर्जत तालुका हद्द या मार्गात थेरगाव व चिंचोली रमजान येथील भाग हा वनपरिक्षेत्रात येतो. आता वनविभागाने वनपरिक्षेत्रात रस्ते बांधकामाला मंजुरी दिल्यामुळे या रस्त्याच्या कामांना गती मिळेल.

संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी यांना बरोबर घेऊन आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या, भेटी घेतल्या व आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर आता वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत काम सुरू असलेल्या या रस्त्यांच्या वनपरिक्षेत्रातील बांधकामाला मंजुरी दिली आहे. याचा फायदा हा रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यास नक्कीच होईल.


प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेला पाठपुरावा तसंच आदरणीय मुनगंटीवार साहेबांसोबत दोन वेळा झालेल्या चर्चेमुळे आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा विषय मिटला यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

-आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here