धनगर आरक्षणाचा वटहुकुम काढावा – अक्षय शिंदे आरक्षण द्या अन्यथा आम्ही प्राण त्याग करणार – यशंवत सेना

0
93

जामखेड न्युज——

धनगर आरक्षणाचा वटहुकुम काढावा – अक्षय शिंदे

आरक्षण द्या अन्यथा आम्ही प्राण त्याग करणार – यशंवत सेना

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या माध्यमातून उपोषण आंदोलन सुरू आहे. सरकारने विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणाचा वटहुकुम काढावा असे अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी सांगितले. आरक्षण द्या अन्यथा आम्ही प्राण त्याग करू असे यशंवत सेनेने सांगितले. 

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा वटहुकूम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे पदाधिकारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

यावेळी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांनी या अंदोलकांची भेट घेतली व धनगर आरक्षण आणि मेंढपाळांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सोडवण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी विरोधी पक्षांनी लोकांच्या हिताचं जे संघटन आहे त्यांनी देखील केंद्र सरकारकडे याबाबतची मागणी करावी अशी विनंती आ. रोहित पवार यांच्याकडे केली.

यावेळी त्यांच्या मागण्या जाणून घेत उपोषणाला पाठिंबा दिला आणि तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली.

यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, माजी मंत्री व यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, रूपनवर तसेच अनेक समाजबांधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रा. मधुकर राळेभात, अविनाश शिंदे, राजेंद्र पवार, कुंडल राळेभात, प्रकाश सदाफुले, किसनराव ढवळे, प्रवीण उगले, विश्वनाथ राऊत पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here