जामखेड न्युज——
महामानवांना अपेक्षित असलेले काम लक्ष्मी पवार यांच्या माध्यमातून जनविकास सेवाभावी संस्था करत आहे – मुख्याध्यापिका शोभा कांबळे
लक्ष्मी पवार यांचे काम कौतुकास्पद गुरूवर्यांची त्यांच्यावर कौतुकाची थाप
महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची घातले यामुळेच आपण समाजात ताट मानेने जगत आहोत. महामानवांना अपेक्षित असलेले काम समाजसेविका लक्ष्मी पवार यांच्या माध्यमातून जनविकास सेवाभावी संस्था करत आहे असे मत शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे यांनी व्यक्त केले. लक्ष्मी पवार यांचे काम कौतुकास्पद अशी गुरूवर्यांनी त्यांच्यावर कौतुकाची थाप दिली आहे.
शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षकदिना निमित्त हरिभाऊ कदम गुरूजी, किसनराव जगदाळे गुरूजी, अर्जुन आढाव गुरूजी, ज्ञानदेव कदम गुरूजी, शासकीय निवासी शाळा आरोळेनगरच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.
शोभा कांबळे यांना उत्कृष्ट मुख्याध्यापिका प्रावीण्य पुरस्कार प्रदान करण्यात आला याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या लक्ष्मी पवार यांचे प्रत्यक्षात काम आहे कसलाही दिखावा नाही.
सत्काराला उत्तर देताना गुरूवर्यांनी त्यांच्या विद्यार्थीनी व जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे अश शाबासकीची व कौतुकाची थाप देवून गुरूवर्यांनी लक्ष्मी पवार यांचे कौतुक केले.
जामखेड तालुक्यातील जनविकास सेवाभावी संस्था मार्फत श्रीमती लक्ष्मी पवार या भटक्या समाजातील लोकांसाठी विविध प्रकारचे सामाजिक व शैक्षणीक काम करत आहेत. भटक्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या प्रयत्न करीत असून त्यांनी पारधी समाजातील अनेक मुलांचे जातीचे दाखले काढले असून त्यांना नेहमी अधार देण्याचे काम करत आहे. त्यांनी त्यांचे स्वतः च्या मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात आदर्श निर्माण केला आहे. ही अभिमानाची बाब आहे .