जामखेड न्युज——
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने वीर पत्नी, वीर माता यांचा सन्मान
आजादी का अमृत मोहत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन विरों का वंदन या कार्यक्रमा निमित्त जामखेड पोलीस ठाणे मध्ये शहीद जवान यांच्या वीर पत्नी व शहीद जवान यांच्या वीर माता शोभा कृष्णाजी भोसले रा. शिवाजी नगर जामखेड यांचा सन्मान करण्यात आला.
त्याच्याशी संवाद साधून, त्याच्या काही अडीअडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू असे सांगण्यात आले.यावेळी शिवनेरी अँकँडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, माजी सैनिक बजरंग डोके, अशोक चव्हाण, अंगद कोल्हे त्यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, सहाय्यक फौजदार शिवाजी भोस, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव, विजय सुपेकर, ज्ञानेश्वर कोठुले, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल भूंबे, मनीषा दहिरे, पूजा धांडे यावेळी उपस्थित होते. श्री मयूर भोसले सर यांनी कार्यक्रम सूत्रसंचालन केले. आभार पोलीस नाईक अविनाश ढेरे यांनी मानले.