जामखेड न्युज——
जामखेड ते चिंचपूर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत – सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे
हा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा
जामखेड ते चिंचपूर हा रस्ता अंत्यत खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी लेखी पत्राद्वारे ठेकेदार देशमुख कंट्रक्शन केली आहे.
या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. हा रस्ता अंत्यत खराब झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्त्यावर अपघात वाढले आहेत. हा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी देशमुख कंट्रक्शन टेंभुर्णी व्यंकटेशराव चौधरी यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
जामखेड ते चिंचपूर हा रस्ता अंत्यत खराब झाला आहे. मोठ मोठी खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत. अनेकांचा जीव गेला आहे. तर शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले आहेत. त्यामुळे ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी केली आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आजपर्यंत मंदिर जिर्णोद्धार, रंगकाम, वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची सोय, गटारे बांधकाम, अनेक ठिकाणी लाईटची सोय, महाशिवरात्रीला शंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भावीक भक्तांसाठी फराळाची सोय, अनेक शिवरस्ते, अनेक ठिकाणी वृक्षारोपण, झाडांना संरक्षक जाळी, उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा, अनेक शाळांना होम थिएटर, कबड्डी, क्रिकेट टीमसाठी कीटचे वाटप, कोरोना काळात अनेकांना मास्क, सॅनिटाजर, किराणा कीटचे वाटप, भारतीय संविधान दिनानिमित्त स्नेह भोजन, मकरसंक्रांत निमित्त विविध कार्यक्रम, रक्षाबंधन निमित्त झाडांना राखी बांधणे, भक्ती शक्ती महोत्सवात मंडप व लाईटची व्यवस्था
तसेच शहरात दुकानदारांना डस्टबिन वाटप, स्वच्छता अभियान लोकचळवळ बनविली हरित जामखेड साठी अनेक ठिकाणी वृक्षारोपण व त्यांचे संगोपन केले, रमजान ईदमध्ये मुस्लिम बांधवांना फळे वाटप, अनेक ठिकाणी शाळांना मदत सारोळा येथे शाळेस गेट बसवून दिले, बीड रोड ते ल. ना. होशिंग विद्यालयास जोडणारा तीस वर्षांपासून चा बंद रस्ता चालू करून पेव्हिंग ब्लॉक बसवले लाईटची सोय केली ग्रामीण रुग्णालय बोअरवेल घेऊन मोटार बसवून दिली लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय केली या सह अनेक अशी सामाजिक कामे मार्गी लावली. जनतेची नेहमीच काळजी घेणारा हा खरा समाजसुधारक आहे.