Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या मोटारसायकल पेटवल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एक जणाविरोधात गुन्हा दाखल

मोटारसायकल पेटवल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एक जणाविरोधात गुन्हा दाखल

0
255

जामखेड न्युज——

मोटारसायकल पेटवल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एक जणाविरोधात गुन्हा दाखल

वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन आम्हाला तु परत का देत नाहीस या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या शेताजवळ लावलेली मोटारसायकल पेटवून दिली या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एका जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, फिर्यादीचे वडील रामभाऊ हजारे यांनी सुमारे १६ वर्षापूर्वी जवळा गावात राहणारे महेबुब गुलाब शेख यांच्या मालकिची जवळा गावात शेतगट नंबर २६५ मध्ये असलेली शेतजमीन विकत घेतलेली आहे. दि. १६ आँगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी व त्याचे वडील दोघे जण मोटारसायकलवर जवळा गावच्या शिवारात गेले होते. यावेळी तेथे आरोपी नबाब महेबुब शेख रा. जवळा ता. जामखेड हा फिर्यादी गणेश रामभाऊ हजारे वय २७ वर्षे हल्ली रा. कात्रज कोंढवा रोड टिळक नगर पुणे (मुळ रा. जवळा ता.जामखेड) याच्या जवळ आला व म्हणाला की, माझ्या वडिलांकडून विकत घेतलेली शेतजमीन आम्हाला तु परत का देत नाहीस असे म्हणून फिर्यादीची मोटारसायकल क्रमांक एम एच १२ एस एच १४६९ ही जाळून टाकून नुकसान केले

या प्रकरणी गणेश रामभाऊ हजारे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी नबाब महेबुब शेख याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल लोखंडे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!