जामखेड न्युज——
जामखेडच्या सुपुत्राचा होणार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
अशोक आडाले यांना राष्ट्रपती पदक जाहीर!!!
परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
तालुक्यातील जांबवाडी येथील अशोक कुंडलिक आडाले वय ५३ वर्षे महाराष्ट्र कारागृह विभागात कारागृह पोलीस काँन्टेबल या पदावर कार्यरत असून आपल्या २९ वर्षाच्या कारागृह विभागातील उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. जामखेड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अशोक आडाले हे १९९५ मध्ये वर्ग दोन विसापूर कारागृह येथे पहिली नियुक्ती झाली येथे पाच वर्षे जेल सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. यानंतर २००५ मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुविख्यात गुंडावर करडी नजर ठेवण्यात ते प्रमुख होते.
गडचिरोली येथे नवीन जेल बनवण्याची जबाबदारी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तत्कालीन कारागृह निरीक्षक मीरा बोरवणकर तसेच कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या वर सोपवली होती. गडचिरोली येथे जेल करण्यास नक्षलवादी यांचा विरोध होता. यावेळी स्वाती साठे यांचे सुरक्षा रक्षक व वाहन चालक म्हणून आडाले यांनी कामगिरी बजावली होती. नक्षलवादी यांचा विरोध असतानाही जेल बनवून उद्घाटन केले. या कार्याची दखल म्हणून राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
चौकट
अशोक आडाले यांना देशसेवेचा वारसा
अशोक आडाले यांचे वडील कुंडलिक विठोबा आडाले वय ८७ हेही माजी सैनिक आहेत. त्यांनीही १९७१ ते १९७५ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा रक्षक म्हणून कामगिरी केलेली आहे. हाच वसा अशोक आडाले यांनी पुढे चालवला आहे.