जामखेड न्युज——
तरुणांनी उद्योग व्यवसाय करून आर्थिक सक्षम व्हावे – पुरुषोत्तम खेडेकर
मराठा समाज सक्षम होण्यासाठी प्रथम तो आर्थिक सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी चहा विक्रीपासून ते लहान मोठा कोणताही उद्योग व्यवसाय केला पाहिजे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
मराठा जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने ते जामखेड येथे आले होते.यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुरे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, प्रा.मधुकर आबा राळेभात, राम निकम, मा.राहुल उगले,मा.शरद कार्ले, सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की नोकरी करणाऱ्या समाजाने आपल्या समाजासाठी,समाज बांधवांसाठी मदत केली पाहिजे. आपल्या मेंदूचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे.आपण, आपले कुटुंब व आपले जवळचे शेजारी-पाजारी सर्व चांगले राहतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, यातूनच आपले व समाजाचे भले होईल.यासाठी वाचन संस्कृती जपली पाहिजे.गरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे.
त्यांच्यासाठी वस्तीगृह बांधली पाहिजेत व सर्वांना मदतीचे धोरण ठेवले पाहिजे.समाज जागृत करण्यासाठी नेहमी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे व यातून समाज हीत साधले पाहिजे .मराठा समाजाबरोबरच इतर समाजाचे देखील सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजेत.याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राम निकम यांच्यासह अवधूत पवार, डॉ.अविनाश पवार, डॉ,भरत देवकर, डॉ, प्रदीप कात्रजकर, अँड.हर्षल डोके, किसन वराट, प्रा. लक्ष्मण ढेपे, केशव कोल्हे, एकनाथ चव्हाण, गणेश वारे, काका चव्हाण, पै.आण्णा ढवळे, प्रविण बोलभट, आबा साळुंके, कुंडल राळेभात, संभाजी ढोले, दिगंबर चव्हाण, युवराज ढेरे, कैलास खैरै, वळेकर भाऊसाहेब, विश्वनाथ खेंगरे, नारायण लहाने, मिलिंद भोरे, राजेंद्र काटकर आदींसह मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राम निकम यांनी तर आभार संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी मानले.