ग्रामसभेत कामाची माहिती मागणाऱ्या ग्रामस्थास सरपंच पतीची मारहाण, ग्रामस्थांनी लावले ग्रामपंचायतला टाळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ

0
275

जामखेड न्युज——

ग्रामसभेत कामाची माहिती मागणाऱ्या ग्रामस्थास सरपंच पतीची मारहाण,

ग्रामस्थांनी लावले ग्रामपंचायतला टाळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ

 

तालुक्यातील नायगाव येथे ग्रामसभा सकाळी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र सरपंच गैरहजर होते. ग्रामसभा इनकँमेरा सुरू होती. यावेळी परशुराम आजिनाथ शिकारे यांनी घुलेवाडी येथील कामाची माहिती मागितली असता सरपंच पती ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बाबासाहेब उगले यांना राग आला व शिकारे यांना बाजूला घेऊन मारहाण केली या घटनेमुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला टाळे लावले यामुळे नायगाव सह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. खर्डा पोलीस स्टेशनला चंद्रकांत उगले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील नायगाव येथे आज दि. ३ रोजी सकाळी दहा वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेला सरपंच गैरहजर होते. यावेळी नायगाव ग्रामपंचायत अंतर्गत घुलेवाडी येथील फिर्यादी परशुराम आजिनाथ शिकारे वय २६ यांनी घुलेवाडी येथे किती कामे मंजूर आहेत. किती पुर्ण झाली किती अपुर्ण आहेत याची माहिती लेखी स्वरूपात ग्रामसेवकास मागितली या घटनेचा राग आल्याने सरपंच पती व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत उगले यांनी फिर्यादी शिकारे यास लाथाबुक्यांनी मारहाण केली व दमबाजी केली हे सर्व इनकँमेरा सुरू होते.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नायगाव ग्रामपंचायतला टाळे लावले आज दिवसभर टाळे होते. संपूर्ण तालुक्यात याविषयी एकच चर्चा होती. विशेष म्हणजे या ग्रामसभेसाठी सरपंच गैरहजर होते यांचे पती हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. माहिती मागणाऱ्या ग्रामस्थास मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला टाळे लावले व शिकारे यांनी सरपंच पती ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत उगले याच्या विरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here