रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी पंचायत समितीला प्रस्ताव सादर करावेत – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0
194

जामखेड न्युज——

रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी पंचायत समितीला प्रस्ताव सादर करावेत – गटविकास अधिकारी प्रकाश

महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजना राबवली जात असून जामखेड तालुक्यासाठी 479 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती जामखेड येथे सादर करावा. प्रथम येणाऱ्या प्रस्तावास प्राधान्य दिले जाईल असे जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले.

घरकुल योजनेचा मुख्य उद्देश मागासवर्गीय, म्हणजे एससी, एसटी किंवा नव-बौद्ध वर्गातील प्रत्येकाला राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे आणि समाजात त्यांचा दर्जा उंचावण्यास मदत करणे हा आहे.

या योजनेसाठी खालील प्रमाणे अटी आहेत
१. लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा
२. लाभार्थी ग्रामपंचायत चा रहिवासी असावा
३. यापूर्वी कोणत्याही योजनेतून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा
४. लाभार्थ्याचे उत्पन्न 1.20 लाख रुपये च्या आत असावे
५. घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असावी.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
१. घरकुल मागणी अर्ज
२. जातीचा दाखला (प्रांत यांचा)
३. रहिवासी दाखला
४. रेशन कार्ड
५. जॉब कार्ड
६. आधार कार्ड
७. बँक पासबुक
८. जागेचा उतारा
९. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा)
१०. लाभार्थी निवडीबाबत ग्रामसभा ठराव
११. ग्रामपंचायतचा कर थकीत नसल्याचे प्रमाणपत्र
१२. यापूर्वी कोणत्या योजनेतून सदर लाभार्थ्यास लाभ दिल्या नसल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र

-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड यांनी सांगितले आहे. 

रमाई आवास योजना योजनेसाठी नोंदणी करणे
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल आणि त्यासाठी नोंदणी करता येईल. त्या भागातील ग्रामपंचायतींनी यादी तयार करून सर्वत्र पाठवली आहे. कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावरही लावली जाते. योजनेमध्ये नमूद केल्यानुसार अर्जदार केवळ SC, ST किंवा नव-बौद्ध वर्गातील असणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here