जामखेड न्युज——
भाजपाच्या वाचाळविरांना जशास तसे उत्तर देणार – शाम कानगुडे
आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील बेरोजगारी कमी करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एमआयडीसी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने सुयोग्य जागा बाकी कार्यवाही अडीच वर्षात पूर्ण केली पण सरकार बदलले या पावसाळी अधिवेशनात मान्यता देऊ म्हणून उद्योग मंत्री उदय सावंत यांनी सांगितले पण मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे म्हणून आमदार रोहित पवार यांनी काल दि. २४ रोजी भरपावसात विधानसभा पायरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरु केले. सरकारने दखल घेत आजच उद्योग विभागाशी बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते तेव्हा उपोषण मागे घेतले होते. मतदारसंघात अनेक वाचाळविर काहीही बकबक करत आहेत यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असे शाम कानगुडे यांनी सांगितले.
कालच्या घटनेनंतर भाजपाचे वाचाळविर बिनकामाची बकबक करत आहेत. त्यांनी आपली बुद्धी तपासावी अन्यथा मतदारसंघातील बेरोजगार युवकांच्या वतीने वाचाळविरांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा शाम कानगुडे यांनी दिला आहे.
उद्योगमंत्री सामंत यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की माझ्या मतदारसंघात रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून आज आंदोलन केलं. गेल्या वर्षभरात अनेकवेळा उदय सामंत, मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करत होतो. मागे काय झालं त्यात न जाता आज अनेक नेते येऊन भेटले. उदय सामंत साहेब यांनी येऊन उद्या बैठक घेण्याचा शब्द दिला आणि अधिवेशन संपण्याअगोदर अधिसूचना काढणार असाही शब्द दिला. महाराष्ट्राचे मंत्री म्हणून विश्वास ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मी माझं आंदोलन मागे घेतोय, असे रोहित पवार म्हणाले. जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे झालं नाही तर, माझ्यासह माझ्या मतदारसंघातील अनेक आमदार मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील असेही रोहित पवार यावेळी म्हणाले होते.
कर्जत जामखेड मतदारसंघातील भाजपाचे वाचाळविर काहीही बडबडत आहेत त्यांना शांत राहण्याचा सल्ला शाम कानगुडे यांनी दिला आहे अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असे जामखेड न्युजशी बोलताना सांगितले आहे.