आमदार रोहित पवारांच्या विरोधकांनी एमआयडीसी रद्द करण्यात वेळ घालवण्याऐवजी आयटी पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करावेत – सरपंच निलेश पवार

0
334

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या विरोधकांनी एमआयडीसी रद्द करण्यात वेळ घालवण्याऐवजी आयटी पार्क उभारण्यासाठी प्रयत्न करावेत – सरपंच निलेश पवार

 

मा.आ.रोहित दादा पवार याच्या विरोधी लोकांनी MIDC कॅन्सल करण्यासाठी नव्हे तर IT Park उभारण्यासाठी उपोषण करावे – मा. निलेश पवार सरपंच बावी

काल कर्तव्यदक्ष लोकप्रीय आमदार मा. रोहित दादा पवार यांनी कर्जत जामखेड तालुक्यातील MIDC च्या प्रश्नावर आंदोलन केले. त्या आंदोलनाचा आज काही नेते व काही ठराविक लोक निषेध करत आहेत. पण तसे पाहिले तर खरतर दोन्ही तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या हक्कासाठी MIDC यावी यासाठी तुम्ही पण प्रयत्न केले पाहिजेत.

पण काही राजकारणी लोक श्रेय घेण्यासाठी उगाच आपला विरोध करत आहेत. पण त्यांना हे समजत नाही यात तालुक्याचे नुकसान आहे तुम्हाला व तुमच्या नेत्याला लयच हाऊस असेल तर दोन्ही तालुक्यात आयटी पार्क यावे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात उपोषण करावे आणि कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेला न्याय मिळून द्यावा.

उगाच स्टंटबाजी करून काही मिळत नसते. मा.आ.रोहित दादाचे काम दोन्ही तालुक्यातील सर्व लोकांना माहित आहे त्यामुळे तुम्ही किती पण विरोध करा रोहित दादा जनते सोबत आहेत आणि जनता रोहित दादा सोबत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here