विधानपरिषद सभापती पदासाठी आमदार प्रा राम शिंदे यांचे नाव आघाडीवर

0
187

जामखेड न्युज——

विधानपरिषद सभापती पदासाठी आमदार प्रा राम शिंदे यांचे नाव आघाडीवर

विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपकडून राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी राम शिंदे यांचं नाव भाजपकडून सर्वात पुढे आहे. नगरच्या कर्जतमधून दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेले राम शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या रोहित पवारांकडून पराभूत झाले. त्यानंतर आता त्यांची विधानपरिषदेवर निवड झालीय. विधानपरिषद सभापती पदासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे असे भाजपाच्या गोटातून समजते

आमदार प्रा. राम शिंदे यांना संधी मिळाल्यास
ओबीसी मतपेटीला न्याय मिळू शकेल, असे मत व्यक्त केले जात आहे. मुंबई बॅंकेचे अध्यक्ष आणि भाजप सत्तेत नसताना खंबीर भूमिका बजावत पक्षाला आधार देणारे प्रवीण दरेकर किंवा शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस यात उत्तम संबंध असलेले उद्योजक प्रसाद लाड यांचेही नाव चर्चेत आहे. मुंबईतून मंत्रिपदासाठी साठमारी होणार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायम आधार देणाऱ्या या दोन नेत्यांना सभापतीपदाची संधी मिळू शकेल, अशीही चर्चा आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या देखरेखीखाली कारभार चालवू नये,’ या मागणीवर उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यांसह महाविकास आघाडी आक्रमक असल्याने आता रिक्त असलेल्या सभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय सत्ताधारी युती घेणार असल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here