जामखेड न्युज——
जामखेड शहरातील प्रतिष्ठित असलेल्या शिवाजीनगर, विद्या कॉलनी परिसरात रस्त्यांची दुरावस्था
परिसरातील नागरिकांनी रस्त्याची मागणी
जामखेड शहर, शिवाजीनगर, विद्या कॉलनी
येथील मिनाबाई जाधव घर ने दत्तात्रय ढाळे सर
रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करणेबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी नगरपरिषद जामखेड निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरातील नामांकित वसाहत असलेल्या शिवाजीनगर, विद्या कॉलनी भागात रहात आहोत आम्ही वारंवार विनंत्या केल्या निवेदन दिलेले आहेत, परंतु आद्यापपर्यंत आमच्या मुख्य रहदारी असलेल्या रस्त्याची कोणत्याही प्रकारची दुरूस्ती झालेली नाही, सदर रस्त्यावरील वसाहतीमध्ये साधारणपणे 70 से 80 घरे आहेत व जाण्यासाठी रस्ता हा पानंद रस्त्यापेक्षाची वाईट आवस्था आहे.
पाऊस पडल्यानंतर चालणेही अशक्य होते. सदर सत्यासाठी वारंवार व विनंत्या, अर्ज केलेले आहेत. परंतु आतापर्यंत कोणीही दखल घेतली नाही व सदर रस्ता दुरुस्त झालेला नाही. तरी ताबडतोब रस्ता दुरूस्ती करावा व काँक्रीटीकरण करावे अशी मागणी मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या कडे परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर अमोल बहिर, शांतीलाल पारखे, आजीनाथ शिरसाठ, बाळासाहेब बोराटे, संदीप बहिर, प्रशांत कुंभार, राजेंद्र कोहक, लक्ष्मण वटाने, अशोक राऊत, अमोल पिंपरे, बाळासाहेब ठाकरे, गौतम केळकर, गौतम गायवळ यांच्या सह सुमारे साठ लोकांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.