जामखेड न्युज——
संविधान समता दिंडीचे आज खर्डा येथून प्रस्थान – ॲड. डॉ.अरुण जाधव.
ग्रामीण विकास केंद्र, संविधान साथी टीम व माय लेकरू प्रकल्प कर्जत – जामखेडच्या वतीने आयोजित खर्डा ते धाकटी पंढरी धनेगाव संविधान समता वारकरी दिंडीची तयारी पूर्ण झाली असून ही दिंडी आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच गुरुवार दि.२९ जून रोजी सकाळी १० वाजता श्री क्षेत्र सिताराम गड खर्डा येथून निघणार असल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिली.
सिताराम गड खर्डा येथे सकाळी १० वाजता उद्योजक दादा पाटील दाताळ व उद्योजक शहाजी सोनवणे हे संविधान दिंडीतील सहभागी कार्यकर्त्यांना फळे वाटप करणार आहेत. तर उद्योजक महादेव जाधवर हे कार्यकर्त्यांना खिचडी व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करणार आहेत. डॉ राळेभात व समस्त वडार समाज संघटनेच्या वतीने चहापाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सातेफळ, वंजारवाडी, तरडगाव फाटा, सोनेगाव मार्गे धनेगाव येथे ही दिंडी सायंकाळी ४ वाजता विठ्ठल मंदिरात पोहोचणार आहे. सतेफळ येथे राजेंद्र भोसले, अजिनाथ लटके, मोहन भोसले, सावळा भोसले, मच्छिंद्र भोसले, अप्पा भोसले, अशोक भोसले, व समस्त गावकरी मंडळी खिचडी फराळ व चहा पाण्याची व्यवस्था करणार आहेत. वंजारवाडी येथे रावसाहेब खोत व समस्त गावकरी मंडळी चहापाण्याची व्यवस्था करणार आहेत. तरडगाव फाटा येथे पंचशील युवा मित्र मंडळाच्या वतीने, सोनेगाव येथे लखन मिसाळ मित्र मंडळ व महिला मंडळाच्या वतीने चहा पाणी व केळीचा फराळ देण्यात येणार आहे. तर धनेगाव येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने चहा पाणी व फराळ देण्यात येणार आहे.
भारताचे संविधान हे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, सामाजिक न्याय या मूलभूत तत्त्वावर आधारित आहे. आजच्या पिढीला आपला हक्क, अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी या उद्देशाने ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात यावर्षी संविधान दिंडी आयोजित करण्यात आली आहे. या दिंडीमध्ये संविधानिक मूल्यांचा प्रचार, प्रसार करण्याचा संदेश या निमित्ताने देण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले.
प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे जाती व धर्म भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. ६ ते १४ वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. देशातील नागरिकांना असणाऱ्या मूलभूत हक्काबद्दल या दिंडीमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, भाषण अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध हक्क, धर्म स्वातंत्र्य, हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क तसेच न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क या मूलभूत हक्कांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.
या संविधान समता वारकरी दिंडीसाठी ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सचिव उमाताई जाधव, संचालक बापू ओहोळ, प्रकल्पाधिकारी सचिन भिंगारदिवे, वैजनाथ केसकर, संतोष चव्हाण, अतुल ढोणे, राजू शिंदे, रजनी आवटी, ऋषिकेश गायकवाड, विशाल पवार, तुकाराम पवार, गणपत कराळे, दिपाली काळे, शितल काळे, शहाणूर काळे, राहुल पवार, नंदकुमार गाडे, फरिदा शेख, शुभांगी गोहर, अर्चना भैलुमे, दिसेना पवार, काजोरी पवार, ममता पवार, पल्लवी शेलार, उज्वला मदने, सुनीता बनकर, लता सावंत, रोहिणी राऊत आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.