जामखेड पोलीसांची खर्डा चौकात दंगा काबू योजनाची रंगीत तालीम

0
152

जामखेड न्युज——

जामखेड पोलीसांची खर्डा चौकात दंगा काबू योजनाची रंगीत तालीम!! 

सार्वजनिक सण उत्सवांमध्ये दोन समाजात दंगल होण्याची शक्यता गृहीत धरून जामखेड पोलीसांनी
आज दि. २८ जून रोजी सायंकाळी ६: २० ते ७ :५९ वाजताचे दरम्यान शहरातील खर्डा चौकात दंगा काबू योजनाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे.

अलिकडील काही दिवसांमध्ये याचा प्रत्यय आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या दि. २९ जून रोजी हिंदू बांधवाचा आषाढी एकादशीचा व मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हे दोन्ही सण एकत्र आले आहेत. या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. २८ जून रोजी सायंकाळी ६: २० ते ७ :५९ वाजताचे दरम्यान शहरातील खर्डा चौकात दंगा काबू योजनाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे.

उद्या दि. २९ जून बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने सदर त्या अनुषंगाने खर्डा चौक, जामखेड येथे मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात भांडणे चालू आहेत. त्यामुळे २ समाजात जातीत तेढ निर्माण होऊन दंगा सुरू झाला तर या घटनेला कसा प्रतिसाद दिला पाहिजे. समाजातील गटामध्ये वाद चालू झाला असल्याचे प्रात्यक्षिक दाखवत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. यासाठी पोलीस दलासह सर्व यंत्रणा ,सर्व प्रशासकीय अधिकारी याकरिता सज्ज आहेत असे यातून दिसून आले आहे दंगा काबू योजनेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, उपनिरीक्षक अनिल भारती, सहाय्यक फौजदार शिवाजी भोस, पोलीस हवालदार संजय लाटे, रमेश फुलमाली, पोलीस नाईक अविनाश ढेरे, ज्ञानदेव भागवत, अजय साठे, संतोष कोपणर, प्रकाश जाधव, ईश्वर परदेशी, प्रकाश मांडगे, देवीचंद पळसे, प्रवीण पालवे, देशमाने, देवढे, सुपेकर महिला पोलीस कॉन्स्टेबल दहिरे ,धनवडे असे १ पोलीस निरीक्षक, २ दुय्यम अधिकारी, २५ पोलीस अंमलदार, २ होमगार्ड या प्रात्यक्षिक करिता हजर होते.

तसेच दंगा काबू योजना ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नंदकुमार गव्हाणे, फायर ब्रिगेडचे वाहन व पथक, रूग्णवाहीका अशी यंत्रणाही उपलब्ध ठेवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here