गोरक्षकास मारहाण प्रकरणी वसीम बिल्डर उर्फ वसीम कुरेशी सह दहा ते बारा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
554

जामखेड न्युज——

गोरक्षकास मारहाण प्रकरणी वसीम बिल्डर उर्फ वसीम कुरेशी सह दहा ते बारा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

कत्तलीसाठी चाललेल्या गोवंशाच्या जनावरांचा टेम्पो अडवून जामखेड पोलीस स्टेशनला आणत असताना सम्राट फायर वर्क, वृदांवन मगंल कार्यालय शेजारी जामखेड ता. जामखेड येथे रोडवर अचानक दोन मोटारसायकल व दोन चारचाकी वाहनामध्ये दहा ते बारा इसम (वय अंदाजे 20 ते 30 वर्षे) आले त्यांनी त्याचे वाहने टेम्पो समोर लावली व आमचा रस्ता अडविला.
व हाताने तसेच गाडीत असलेल्या काठ्यांनी आम्हाला मारहाण केली.

पांडुरंग पोपट शिंदे वय 35वर्ष धंदा शेती रा.पाटोदा(ग) ता.जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वसीम बिल्डर उर्फ वसीम कुरेशी सह दहा ते बारा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी पांडुरंग पोपट शिंदे वय 35वर्ष धंदा शेती रा.पाटोदा(ग) ता.जामखेड जि. अहमदनगर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी शिवप्रतिष्ठान संघटनेचे काम करतो तसेच गोरक्षक म्हणुन सामाजिक कार्य करतो. ‘
काल दि 23/06/2023 रोजी रात्री 11/00वा. चे सुमारास मला माही जळगाव ता.कर्जत येथील
मित्राकडुन मला माहीती मिळाली की, माहिजळगाव येथून जामखेड कडे कत्तलीसाठी एका टेम्पोत गोवंश जातीची जनावरे घेऊन जात आहेत. अशी माहीती मिळाल्याने मी व माझे गावातील मित्र प्रदिप सुभाष वडवकर, योगेश रामचंद्र शिंदे, जगदिश विठ्ठल भाकरे अशांनी सदरील वाहनास 11/30वा. चे सुमारास पाटोदा गावठाण हद्दीत रोड पर थांबवले. सदर टेम्पोची पाहणी करता त्यामध्ये दोन बैल, दोन म्हशी व एक जर्सी गायचे खोड़ दिसुन आले सदर वाहनावर.
एम एच 16सी डी 2332 असा नंबर दिसुन आला. तसेच त्यातील एक म्हैस ही बेशुध्द असल्याचे दिसले.

चालकास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव विजय एकनाथ अवसरे असे सांगितले. तेव्हा आम्ही चालकास वाहन पोलीस स्टेशन जामखेड येथे घेण्यास कळविले. चालकासोबत वाहनामध्ये माझे मित्र आलेले प्रदिप सुभाष वडवकर, योगेश
रामचंद्र शिंदे असे बसले. मी व जगदीश विठ्ठल भाकरे, बळीराम रामचंद्र लंघे असे वेगवेगळ्या दोन मोटारसायकल वर वाहनाच्या पाठीमागे जामखेड कडे येत होतोत.

दि. 24/06/2023 रोजी रात्री 12/15 वा. चे सुमारास आम्ही वरील वाहण घेऊन येत असताना सम्राट फायर वर्क, वृदांवन मगंल कार्यालय शेजारी जामखेड ता. जामखेड येथे रोडवर अचानक दोन मोटारसायकल व दोन चारचाकी वाहनामध्ये दहा ते बारा इसम (वय अंदाजे 20 ते 30 वर्षे) आले त्यांनी त्याचे वाहने टेम्पो समोर लावली व आमचा
रस्ता अडविला. आमचे वाहना समोर वाहने थांबवुन आम्हास मोटारसायकल वरील अनोळखी इसमांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. वसीम बिल्डर उर्फ वसिम कुरेशी रा. खर्डा रोड जामखेड हा त्याचे ब्रिझा करामधुन खाली उतरला तसेच त्याचे सोबत आलेले कारमधील अनोळखी इसम देखील खाली उतरले आणि त्यांनी गाडीच्या डिक्या उघडुन सोबत आणलेल्या लाकडी काठ्या हातात घेतल्या व आम्हाला मारहाण करण्यास सुरवात केली वसीम बिल्डर याने सुध्दा काठी हातात घेऊन आमची गाडी आडवता काय? असे म्हणुन मला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मला वसीम बिल्डर उर्फ वसिम कुरेशी व त्याच्या सोबतच्या इसमांनी लाकडी काठ्यांनी व हाताने हातावर, पायावर मारहाण केली. तसेच प्रदिप सुभाष वडवकर यास देखील वसीम बिल्डर उर्फ वसिम कुरेशी व अनोळखी इसमांनी हातावर व पायावर काठीने तसेच हाताने मारहाण केली. मोटार सायकल वर आलेल्या इसमानी मला व माझे मित्रांना हाताने लाथाबुक्यानी मारहाण करुन त्यामुळे आम्ही जीवाच्या भीतीने तेथुन पळुन गेलो.

सदरील घटना वाहन चालक विजय एकनाथ अवसरे यांच्या समोरच घडलेली आहे. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन जामखेड येथे आलो व पोलीसांनी दवाखाना मेमो दिल्याने उपचार करुन तक्रार देत आहोत. मला व माझे मित्र यांना मारहाण करणारे 10ते 12 अनोळखी इसम (वय अंदाजे 20 ते 30 वर्षे) यांना पुन्हा पाहिल्यास ओळखेल अशा आशयाची फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. यानुसार वसीम बिल्डर उर्फ वसीम कुरेशी सह दहा ते बारा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३२४, ३४१, ३२३, १४३, १४७,१४९ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here