गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत जामखेड पोलीसांची मोठी कारवाई, दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल

0
189

जामखेड न्युज——

गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत जामखेड पोलीसांची मोठी कारवाई, दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड पोलीसांकडून गोवंश हत्या बंदी कायद्या अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून २४ रोजी पहिल्या प्रहरी (२३ जून रोजी रात्री १२:१५ ते १२ : २५ वाजताचे सुमारास) केलेल्या कारवाईत पोलीस काॅन्स्टेबल देवीदास सोपान पळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २ खिलार बैल, एक जर्सी वासरू, दोन म्हशी. टेम्पो असा मुद्देमाल जप्त करत महाराष्ट्र पशु संरक्षण, प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियमासह दोघांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बाबत पोलीस काॅन्स्टेबल देविदास सोपान पळसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २३ जून रोजी पोलीस निरीक्षक महेश पाटील याचे समवेत विभागीय गस्त करत असताना मी पोलीस निरीक्षक पाटील, चालक पोलीस हेडकॉन्टेबल आरसुळ असे पोलीस ठाण्याचे जिप क्र. MH-16- CV-0896 हिचे मधुन ११:०९ वा. शहरात गस्त करुन रात्री १२:१५ वा. चे सुमारास विभागीय गस्तसाठी कर्जत पोलीस पोलीस स्टेशनकडे जात असताना सम्राट हॉटेल समोर रोडवर कर्जतकडुन जामखेड कडे एक टेम्पो येताना दिसला. त्यास थांबवून त्याचा संशय आल्याने बॅटरीच्या सहाय्याने बारकाईने पाहणी असता त्यामधे दोन खिलार बैल, एक जर्सीचे वासरू, दोन म्हशी दिसल्या त्यापैकी एक म्हैस मध्ये खाली पडलेली दिसून आली. त्यानुसार सदर टाटा इन्ट्रा कंपनीचा टेम्पो क्रमांक MH-16-CD- 2332 वरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विजय एकनाथ अवसरे वय-28 वर्षे रा. टेकाळेनगर जामखेड असे असल्याचे सांगितले. तसेच त्यास टेम्पो मधील जनावरा बाबत विचारता त्याने सदर जनावरे हे राजु कुरेशी रा. राशीन ता. कर्जत याच्या मालकीची असून ही जणावरे राशीन येथे गाडीत भरुन जामखेड येथे बाजार तळावर उरविण्याचे सांगितले आहे.

जनावरांबाबत कसून चौकशी केली असता चालक अवसरेस समाधान कारक उत्तरे देता आली नाही. त्यावरून सदरची जनावरे ही कत्तलीसाठी घेवुन जात असल्याची खात्री झाली. त्यानुसार सदर टेम्पोसह मुद्देमाल पोलीस ठाण्यात आणला व जनावराची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असल्याने ताबडतोब पशुधन विकास अधिकारी संजय राठोड यांना बोलावुन घेतले वैद्यकीय अधिकारी यांनी सदर जनावराची तपासणी करून सदर जनावराचे स्वास्थ प्रमाण पत्र दिले. तसेच यापैकी एक म्हैस मृत असलेचे घोषीत करण्यात आले.

यावेळी जप्त करण्यात आलेला टेम्पो व त्यामधील जनावराचे वर्णन खालील प्रमाणे

१) १ लाख एक टाटा इन्ट्रा कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. MH-16-CD- 2332
२) २५ हजार खीलार जातीचा पांढ-या रंगाचा १ गोवंश बैल
३) २५,००० रूपयांचा खीलार जातीचा १ पांढ-या कोसा रंगाचा गोवंश बैल
४) ५ हजार रू जर्सि जातीचा १ काळे रंगाचा गोवंश गो-हा
५) २० हजार रू काळे रंगाची १ म्हैस
६)एक म्हशीचा रेडा मृत
असा एकूण एक लाख पंचाहत्तर हजार रूपयांचा मुद्देमाल दोन पंचा समक्ष पोलीस ठाणे अंमलदार सहायक फौजदार भोस यांनी पंचनामा करुन जप्त केले. मृत म्हैस उत्तरीय तपासणी करीता राखुन ठेवली आहे.
तसेच सदर टेम्पो चालकाकडे अधिक चौकशी केली असता टेम्पोचा पाठलाग करणारे गोरक्षक यांना वशीम कुरेशी व त्याचे बरोबरचे १० ते १२ मुलांनी वृदांवन मगंल कार्यालया समोर मारहाण केल्याचे त्याने सांगितले.
तरी आरोपी नामे विजय एकनाथ अवसरे (वय २८) रा. टेकाळे नगर जामखेड व राजु कुरेशी रा. राशीन ता. कर्जत यांनी वर उल्लेखीत टेम्पो मधुन गोवंश व म्हैस जातीचे जनावराची कत्तलीसाठी वाहतुक करताना तसेच निर्दयपणे छोट्या वाहनात कोबुन, निर्दयपणे वागवुन एका म्हैस प्राण्याचे मृत्युस कारणीभुत झाला यानुसार पोलीस काॅन्स्टेबल देवीदास सोपान पळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय एकनाथ अवसरे (वय २८) रा. टेकाळे नगर जामखेड व राजु कुरेशी रा. राशीन ता. कर्जत या दोघांविरुध्द भा.द.वि. कलम 428, महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 चे कलम 9,11 तसेच प्राण्यास क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here