खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच संजीवनी पाटील यांनी आशाताई शिंदेंच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार जनतेला समजलं आहे आपला तो आपलाच असतो – आशाताई शिंदे

0
157

जामखेड न्युज——

खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच संजीवनी पाटील यांनी
आशाताई शिंदेंच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार

जनतेला समजलं आहे आपला तो आपलाच असतो – आशाताई शिंदे

 

जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या खर्डा ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून भाजपाने ताब्यात घेतली आहे. आज दि. १२ जून रोजी पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच संजीवनी वैजीनाथ पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, तीन वर्षांत कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेला कळले आहे की आपला तो आपलाच असतो म्हणून तर पंधरा दिवसात आमदार रोहित पवार यांना तीन धक्के मिळाले आहेत.

यावेळी आशाताई राम शिंदेंसह, भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, बाजार समिती सभापती शरद कार्ले, सोमानाथ राळेभात, माजी सरपंच संजय गोपाळघरे, सर्व भाजपा महिला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रा. प. सदस्य सोपान गोपाळघरे, राजू मोरे, सुग्रीव भोसले, तुकाराम होडशीळ, महेश दिंडोरे, गणेश शिंदे, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, टील्लू पंजाबी, गोटू कांबळेंसह भाजपा कार्यकर्ते व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रवींद्र सुरवसे म्हणाले की, मागील आडीच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मला वैयक्तिक खूप त्रास दिला आहे. आता विरोधकांना त्यांचा पराभव दिसत आहे. कर्जत व जामखेड बाजर सामीतीमध्ये आमचेच सभापती व उपसभापती झाले आहेत. तसेच खर्डा ग्रामपंचायतवर पण आमचाच झेंडा लागला आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते व आ. राम शिंदे यांच्याच प्रयत्नाने बाजार समितीमध्ये वैजनाथ पाटील आलेच पण त्यांच्या पत्नीही सरपंच झाल्या आहेत.

सरपंचपदाच्या निवडीवेळी आमच्याकडे ८ सदस्य होते व विरोधकांकडे ९ सदस्य होते. त्यांच्याकडील आमच्याकडे तीन सदस्य आले व आम्ही बाजूच पलटून टाकली आज भारतीय जनता पक्षाचे सरपंच झाले, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. विरोधकांना आता समजलं आहे. आ. राम शिंदे पुन्हा आलेत. येत्या २०२४ ला बाहेरून आलेलं पार्सल आता बारामतीला पाठवायचा आहे. आ.राम शिंदे यांना निवडून आणायचे आहे. या दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो

 

 

सरपंच संजीवनी पाटील यांचे पती व बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, माझी खरी ताकत ही आ. प्रा.राम शिंदे, कर्जत -जामखेड विधानक्षेत्र प्रमुख रवी दादा सुरवसे व माजी सरपंच संजय गोपाळघरे हे आहेत. यांच्यामुळे मला निवडणूक लढवण्याची ताकद भेटली. नगर जिल्ह्यातील एकमेव खर्डा ग्रामपंचायत ही सर्वोत्तम ग्रामपंचायत करण्याची आज मी जनतेला ग्वाही देतो. आम्ही दोघे मिळून विकास कामे करू. यापुढे गावाचा १००% विकास करण्यात येईल अशी ग्वाही देतो.

यावेळी जामखेड चे मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले, मा.सरपंच संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, बाळासाहेब शिंदे यांनीही आपापले मत व्यक्त करून सरपंचाना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

या वेळी खर्डा प्रेस अध्यक्ष – संतोष थोरात. उपाध्यक्ष- स्वेता गायकवाड.दत्तराज पवार.अनिल धोत्रे.बाळासाहेब शिंदे.धनसिंग साळुंके.पांडुरंग गर्जे.शेकर देशमुख.खर्डा प्रेस क्लब च्या वतीने

सरपंच यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here