जामखेड न्युज——
पैलवान सुजय तनपुरे यांची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड, आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
सोनीपत येथे पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत शिऊर गावाचा सुपुत्र पै.सुजय नागनाथ तनपुरे याची 68 kg वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून जॉर्डन देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जामखेड परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुजय तनपुरे हा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज येथे पंकज हरपुडे व महेश मोहळ यांच्या मार्गदरशनाखाली सराव करत होता. सुजयने दिल्ली,हरियाणा पंजाब अशा राज्यांच्या मल्लांवरती विजय मिळवत महाराष्ट्राला सुवर्ण पदकाची कमाई करून दिली. सुजय हा 7 जुलै रोजी होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.